व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, October 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळातील ‘या’ 53 ग्रामपंचायतींमध्ये असणार महिलाराज ! तालुक्यातील 93 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर

आगामी पाच वर्षांसाठी मावळ तालुक्यातील 93 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत बुधवारी (दि. 23 एप्रिल) वडगाव येथील भेगडे लॉन्स मंगल कार्यालयात काढण्यात आली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 24, 2025
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Announcement of reservation for Sarpanch posts in 93 Gram Panchayats in Maval Taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : आगामी पाच वर्षांसाठी मावळ तालुक्यातील 93 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत बुधवारी (दि. 23 एप्रिल) वडगाव येथील भेगडे लॉन्स मंगल कार्यालयात काढण्यात आली.

मावळ तालुक्यात एकूण 103 ग्रामपंचायती असून त्यांच्या सरपंचपदासाठी 5 मार्च 2025 ते 4 मार्च 2030 या कालावधीसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. तालुक्यातील 103 ग्रामपंचायतींपैकी आदिवासी क्षेत्रातील दहा ग्रामपंचायती अनुसूचित जमातीसाठी कायमस्वरूपी राखीव असून त्यांचा सोडतीमध्ये समावेश नव्हता. उर्वरित 93 ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली आहे.

यावेळी तहसीलदार विक्रम देशमुख, गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान, नायब तहसीलदार गणेश तळेकर, महसूल नायब तहसीलदार अविनाश पिसाळ, मंडल अधिकारी वडगाव मावळ रमेश कदम, मंडल अधिकारी खडकाळा सुरेश जगताप, वडगावचे तलाठी विजय साळुंके, महसूल सहाय्यक बबिता सोनवणे तसेच विविध गावचे आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रमपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • एकूण 93 ग्रामपंचायतीपैकी 9 ग्रामपंचायती अनुसूचित जातीसाठी, 6 ग्रामपंचायती अनुसूचित जमातीसाठी, 25 ग्रामपंचायती नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) तर 53 ग्रामपंचायती सर्वसाधारण वर्गासाठी लहान विद्यार्थ्याच्या हस्ते चिठ्ठया टाकून आरक्षित करण्यात आल्या. सर्वसाधारण 53 ग्रामपंचायतींमधून महिला व पुरुषांसाठी आरक्षण काढण्यात आले आहे.

सरपंच पदाचे आरक्षण आणि ग्रामपंचायत :
अनुसूचित जातीसाठी राखीव (9) – स्त्री राखीव (5) तुंग, कान्हे, ओवळे, शिळींब, शिवणे आणि (4) आंबी, कुजगाव पमा, नाणे, आढले बुद्रुक
अनुसूचित जमातीसाठी राखीव (6) – स्त्री राखीव (3) करूंज, जांभूळ, जांबवडे आणि (3) डोंगरगाव, मळवंडी ठुले, देवले.
नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव (ओबीसी) (25) – स्त्री राखीव (13) सोमाटणे, कुरवंडे, सांगवडे, खडकाळा, मोरवे, शिरगाव, वारू, वरसोली, पुसाणे, औंढे खुर्द, बऊर, खांडशी, पाटण आणि (12) शिळाटणे, करंजगाव, कांब्रे (नामा), मळवली, यलघोल, सांगीसे, वराळे, दारुंब्रे, पाचाणे, भाजे, धामणे, मळवंडी ढोरे.
सर्वसाधारण वर्गासाठी (53) – सर्वसाधारण स्त्री (27) सुदुंबरे, साळुंब्रे, सुदवडी, दिवड, चिखलसे, गहुंजे, कल्हाट, साते, आढले खुर्द, डाहुली, इंदोरी,निगडे, टाकवे बुद्रुक, थुगाव, शिवली, गोवित्री, उर्से, कुसगाव खुर्द, महागाव, घोणशेत, कोथुर्णे आणि सर्वसाधारण (26) आजिवली, ठाकूरसाई, कान्हे, लोहगड, आंबळे, नवलाख उंबरे, वेहेरगाव, ताजे, कार्ला, तिकोना, साई, आढे, परंदवडी, कुसगाव बुद्रुक, आपटी, उकसान, चांदखेड, भोयरे, गोडुंब्रे, येळसे, बेबडओहळ, कोंडीवडे (आ मा), माळवाडी, वाकसई, मुंढावरे आंबेगाव

पुढील गावांमध्ये असणार महिलाराज
आरक्षण सोडतीनंतर उधेवाडी, इंगळून, कशाळ, कुसवली, खांडी, तुंग, कान्हे, ओवळे, शिळीम, शिवणे, करूंज, जांभूळ, जांबवडे, सोमाटणे, कुरवंडे, सांगवडे, खडकाळा, मोरवे, शिरगाव, वारू, वरसोली, पुसाणे, औंढे खुर्द, बऊर, खांडशी, पाटण, सुदुंबरे, साळुंब्रे, सुदवडी, दिवड, चिखलसे, गहुंजे, कल्हाट, साते, आढले खुर्द, डाहुली, इंदोरी, निगडे, टाकवे बुद्रुक, थुगाव, शिवली, गोवित्री, उर्से, कुसगाव खुर्द, महागाव, घोणशेत, कोथुर्णे, केवरे, काले, टाकवे खुर्द, नाणोली तर्फे चाकण, ओझर्डे या 53 ग्रामपंचायतीमध्ये महिलाराज असणार हे स्पष्ट झाले आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! तळेगाव ते चाकण चार पदरी उन्नत मार्ग आणि समांतर चार पदरी रस्त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी
– फसवणुकीला माफी नाही..! बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर ; ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार
– चांगला निर्णय ! अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार


dainik maval jahirat

Previous Post

पवना कृषक सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी भाऊ सावंत, तर व्हाईस चेअरमनपदी गणपत घारे यांची निवड । Maval News

Next Post

आंबी येथील कृषी महाविद्यालयात मधमाशी पालनाचे प्रशिक्षण सुरू । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Beekeeping training begins at Agricultural College in Ambi Talegaon Dabhade

आंबी येथील कृषी महाविद्यालयात मधमाशी पालनाचे प्रशिक्षण सुरू । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Balloon sellers attack each other with knives in Lonavala bloody altercation breaks out between two individuals

लोणावळ्यात फुगे विक्रेत्यांचा चाकूहल्ला ; मुंबई-पुणे महामार्गालगत झोपलेल्या दोघांमध्ये रक्तरंजित हाणामारी

October 17, 2026
horrific accident occurred at Kune Nama in Lonavala 16-year-old boy riding two-wheeler died on the spot

लोणावळ्यात कुणे नामा येथे भीषण अपघात; १६ वर्षीय दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार, संतप्त आदिवासींचा ठिय्या मारीत ‘रास्ता रोको’

October 17, 2026
Pune District Collector office MLA Sunil Shelke his associates and RTI activist Accusations and police complaints

जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सुनील शेळके, त्यांचे सहकारी आणि आरटीआय कार्यकर्त्यात नक्की काय घडलं? आरोप-प्रत्यारोप अन् पोलिसांत तक्रारी

October 17, 2026
Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव शहरात भाजपाला मोठा धक्का ! अतिक्रमणाच्या कारणामुळे युवा नगरसेवकाचे पद रद्द, जिल्हाधिकारी यांचा आदेश

October 16, 2026
Distribution of bicycles to girls in Kusavali village joint initiative by Lions Club Union Bank Marathi Journalists Association Maval

कुसवली गावात मुलींना सायकलींचे वाटप ; लायन्स क्लब, युनियन बँक आणि मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम

October 16, 2026
Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.