मावळ तालुक्यात काँग्रेस पक्ष सध्या कात टाकताना दिसत आहे. मागील महिन्याभरापासून काँग्रेस पक्षात अनेक मोठमोठ्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे प्रवेश होत आहेत. तर दुसरीकडे पक्षाने भाकरी फिरवण्याचा कार्यक्रम सुरु केला असून नव्याने पदाधिकारी नियुक्ती आणि जबाबदारीचे वाटप करण्याचा कार्यक्रम जणू हाती घेतला आहे. ( Antosh Malpote Appointed as President of Sate Mohitewadi Congress I Committee Maval Taluka )
साते – मोहितेवाडी काँग्रेस आय कमिटीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते आणि रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे सदस्य अंतोष मलपोटे यांची नुकतीच निवड जाहीर करण्यात आली आहे. तसेच त्यांना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ ह्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देखील प्रदान करण्यात आले. वडगाव मावळ येथील काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीमध्ये अंतोष मालपोटे यांची निवड जाहीर करण्यात आली. मालपोटे हे मागील अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. सामाजिक क्षेत्रात त्यांचे योगदान आहे. साते व मोहितेवाडी परिसरामध्ये काँग्रेस पक्षाची बांधणी करून पक्ष संघटना मजबूत करणार असल्याचे अंतोष मालपोटे यांनी नियुक्तीनंतर नमूद केले.
मावळ तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यशवंत मोहोळ, प्रांतिक सदस्य दिलीप ढमाले, मावळ महिला अध्यक्षा प्रतिमा हिरे, मावळ युवक अध्यक्ष राजेश वाघोले, मावळ लीगल सेलचे अध्यक्ष, ऍड खंडू तीकोणे, तालुका प्रवक्ता मिलिंद अच्युत, तळेगाव युवक अध्यक्ष समीर दाभाडे, विशाल वाळूंज, योगेश पारगे, युवक कार्याध्यक्ष ॲड. राम शहाणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यशवंत मोहोळ यांनी मावळ तालुक्यात काँग्रेस पक्षाची सुत्रे हाती घेतल्यापासून काँग्रेस पक्षाला अच्छे दिन येताना दिसत आहे, ह्याचे कारण काही दिवसांपूर्वीच रामदास काकडे ह्यांचा पक्षात प्रवेश झाला होता. तर आताही पक्षात इन्कमिंग सुरु असून पक्षाची संघाटनात्मक बांधणी होताना दिसत आहे. ( Antosh Malpote Appointed as President of Sate Mohitewadi Congress I Committee Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– कामशेत पोलिसांकडून गावठी बंदूक व जिवंत काडतुसांसह एकाला अटक, गोठ्यात लपवली होती बंदूक, वाचा सविस्तर
– वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें! परंदवडी इथे तब्बल 8000 वृक्षांची लागवड
– मणिपूरमधील महिला अत्याचाराच्या घटनेचा तीव्र निषेध; वडगाव मावळ शहरात ट्रायबल फोरमकडून भव्य मोर्चा