Dainik Maval News : लोणावळा उपविभागातील लोणावळा शहर, लोणावळा ग्रामीण, कामशेत, वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीतील शाळा, कॉलेज मधील मुख्याधिकारी, प्राचार्य, मॅनेजमेंट, महिला शिक्षिका, पोलीस विभाग यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी विद्यार्थी आणि विद्यार्थीनी यांच्या सुरक्षेबाबत काही महत्वाच्या सुचना देण्यात आल्या आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
शाळा व महाविद्यालयांमध्ये घडणाऱ्या चुकीच्या घटना रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. याकरिता सात दिवसात प्रत्येक शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापन करा, अशा सूचना लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी सर्व शाळांचे प्रमुख यांना दिल्या आहेत. ( Appointment of police officers for each school and college instructions of IPS Sathyasai Karthik )
या बैठकीला आयपीएस सत्यसाई कार्तिक यांसह लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, वडगाव मावळचे पोलीस निरीक्षक कुमार कदम, रेल्वे पोलीस निरीक्षक अरविंद कुमार, वन विभागाचे अधिकारी सागर चुटके, लोणावळा शहर चे सहायक पोलीस निरीक्षक राहुल लाड उपस्थित होते.
शाळा महाविद्यालयांना देण्यात आलेल्या सुचना पुढीलप्रमाणे,
1) शाळा, कॉलेज परीसरात सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, त्याचे मॉनिटरिंग करणे,
2) शाळा, कॉलेजमध्ये तक्रार पेटी सुरक्षित ठिकाणी बसवुन ती नियमित उघडुन त्यातील तक्रारींचे निवारण करणे,
3) शाळा, कॉलेज परीसरातील ग्रे एरिया मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे,
4) विद्यार्थी सुरक्षा समिती व समुपदेशन कक्षाची स्थापना करणे
5) प्रवेशव्दार, बाहेर पडण्याचे गेटवर सीसीटीव्ही कॅमेरे, पीए सिस्टीम बसवुन त्याव्दारे सुचना देणे,
6) पोलीस दादा, पोलीस दिदी, निर्भया पथक, पोलीस पेट्रोलींग याव्दारे शाळा, कॉलेज येथे भेटी देऊन विद्यार्थी, विद्यार्थीनी यांचे सुरक्षेचा नियमित आढावा घेणे,
7) महिला दक्षता समिती स्थापन करून त्यांचे मार्फतीने विद्यार्थीनीचे समस्या जाणुन घेवुन कार्यवाही करणे,
8) शाळा, कॉलेज मधील सर्व स्टाफ, वॉर्डन, सफाईकामगार, बस ड्रायव्हर, सुरक्षारक्षक यांचे चारीत्र पडताळणी करून घेणे,
9) शाळा कॉलेज परीसरातील पानटपरी, दुकाने यांची चेकींग करणे,
10) शाळा कॉलेज परीसरात पोलीस पेट्रोलींग करणे,
11) शाळा, कॉलेज प्रवेशव्दार व बाहेर पडण्याचे ठिकाणी बाहेरील इसमांची व संशयित व्यक्तीची चेकींग करणे,
12) शाळा, कॉलेज मध्ये नियंत्रण कक्षाची स्थापना करून त्याव्दारे सीसीटीव्हीव्दारे संपुर्ण परीसरावर नियंत्रण ठेवणे,
13) शाळा, कॉलेज परीसरात वाढत चाललेले अमली पदार्थाचे सेवनाबाबत संकल्प नशामुक्ती अभियानाव्दारे विद्यार्थीमध्ये जागृती करून त्यांचे समुपदेशन करणे
वडगाव मावळचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत उपस्थित त्यांना संकल्प नशा मुक्ती अभियान व सुरक्षितते संदर्भातील सूचना दिल्या. लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ व रेल्वेचे पोलीस निरीक्षक अरविंद कुमार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. विविध शाळांच्या प्रमुखांनी आपापल्या शाळांमध्ये भेडसावत असलेल्या समस्या उपस्थित अधिकारी वर्गसमोर मांडल्या तसेच शाळा भरताना व सुटताना पोलीस गस्त वाढवण्याची मागणी करण्यात आली.
अधिक वाचा –
– उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पूरग्रस्तांना मदतीच्या धनादेशाचे वाटप । Pune News
– संकल्प नशामुक्ती अभियानात आतापर्यंत 71 कारवाया, 102 जणांवर गुन्हे दाखल, 2 कोटींचा मुद्देमाल जप्त – आयपीएस सत्यसाई कार्तिक
– बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कामशेत पोलिसांना निवेदन, ‘या’ प्रमुख मागण्यांचा समावेश । Kamshet News