मावळ तालुका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा पुणे जिल्हा काँग्रेस (आय) चे उपाध्यक्ष चंद्रकांत सातकर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चंद्रकांत सातकर यांच्या पत्नी आशालता चंद्रकांत सातकर यांचे गुरुवारी (दिनांक 14 सप्टेंबर) रोजी सकाळी साडेसात वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने सातकर कुटुंब शोकसागरात बुडाले आहे. ( ashalata satkar wife of maval taluka congress leader chandrakant satkar passed away )
आशालता सातकर यांनी वयाच्या 72 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मागील अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या, त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज (गुरुवार) दुपारी 1 वाजता वैकुंठ स्मशानभूमी खापरे ओढा कान्हे इथे होईल, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे. चंद्रकांत सातकर यांना त्यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात आशालता सातकर यांची मोलाची साथ लाभली. आशालता सातकर यांच्या पश्चात त्यांचे पती पै चंद्रकांत सातकर, पुत्र अजित सातकर, मुली, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
“चंद्रकांत दादा यांच्या आयुष्यात आशालता वहिनींचा मोठा आधार होता. चंद्रकांत दादांच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीत त्यांचा खंबीर पाठींबा होता. त्यांच्या जाण्याने सातकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यातून सावरण्याची शक्ती ईश्वर त्यांना प्रदान करो. मावळ तालुका काँग्रेसकडून कै. आशालता सातकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.” – यशवंत मोहोळ (तालुका अध्यश्र – काँग्रेस आय)
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मावळच्या आमदार आणि खासदारांच्या उपस्थितीत सोमाटणेतील ‘त्या’ 3 मराठा युवकांचे थेट मुख्यमंत्र्यांना निवदेन
– पवना बंद जलवाहिनी प्रकल्पावरील स्थगिती उठवल्यामुळे मावळमधील सर्वपक्षीय कृती समितीचा मोठा निर्णय! लगेच वाचा…
– शिंदे-फडणवीस-पवार यांचा ‘तो’ पसरवलेला व्हिडिओ चुकीचा? मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण, ‘अत्यंत खोडसाळपणाने…’