व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, July 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘आपलं मत आजच ठरवा, भाजप-आरएसएसची सत्ता उलथवून टाका’, वाचा नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे आयोजित बहुजन अल्पसंख्यांक जनआक्रोश महासभेत प्रकाश आंबेडकर बोलत होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 2, 2023
in देश-विदेश, महाराष्ट्र
prakash-ambedkar-speech

Photo Courtesy : Team Dainik Maval


“निवडणुकीच्या तोंडावर हिंदू मुस्लिम दंगली घडविल्या जातील, समाजात फुट आणखी कशी वाढेल हे पहिल्या जाईल, त्यामुळे आताच निर्णय घ्या, आपलं मत आजच ठरवा आणि भाजप – आरएसएसची सत्ता उलथवून टाका” असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे आयोजित बहुजन अल्पसंख्यांक जनआक्रोश महासभेत ते बोलत होते. यावेळी हारेगाव येथील पीडित युवकांच्या परिवाराला त्यांनी भेट दिली. ( bahujan minority janakrosh mahasabha at rahuri ahmednagar VBA prakash ambedkar speech )

वाढत्या जातीयता आणि धर्मांधतेतून सुरू असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राहुरी येथे बहुजन अल्पसंख्यांक जनआक्रोश महासभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुढे बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘मोदींनी आईची देखभाल केली का? की केवळ दर चार महिन्याला भेटून फोटो इवेंट केले? पंतप्रधानाच्या निवासस्थानी आईला का नेलं नाही? जो आईला सांभाळू शकत नाही, तो मतदारांना काय सांभाळणार? अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदासाठी उभा असलेला उमेदवार त्याच्या कुटुंबासोबत कसा वागतो, त्याचे आई, बायको, मुलं यांच्याशी संबंध कसे आहेत हे बघितलं जातं आणि मगच मत दिल्या जातं. मोदी स्वतःच्या आईशी प्रामाणिक नाही, धर्मपत्नीला सांभाळत नाही तो तुमच्याशी काय प्रमाणिक राहील? भाजप आणि आरएसएसच गठबंधनला तुम्ही उलथून टाकू शकता. निवडणुकीत प्रचाराला वेळ मिळेल न मिळेन, पण माझं मत हे भाजपच्या विरोधात, हे पहिल्यांदा ठरवून घ्या. दुसरी कुठलीच चर्चा नाही, फक्त एकच चर्चा आणि ती म्हणजे भाजपला पुन्हा आम्ही केंद्रामध्ये सत्तेमध्ये येऊ देणार नाही हे ठरवून टाका’, असे आवाहन त्यांनी केले.

India इंडिया आघाडीबद्दल बोलताना बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की, ‘काँग्रेसला आम्ही सांगितलं आहे की, जशी आम्ही शिवसेनेबरोबर जशी युती केली आहे, तशी आपल्याबरोबर करायला तयार आहोत. पण कॉँग्रेसचं घोडं कुठ पाणी पितंय हेच कळायला मार्ग नाही. कॉँग्रेसच्या घोड्याची लगाम ही राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या हातात असल्याचे दिसत आहे.’ अशी टीका त्यांनी केली.

मराठा अरक्षणबद्दल बोलताना ते म्हणाले की, “इथला गरीब मराठा या देशातला एक हिस्सा आहे. गरीब आहे त्याला श्रीमंत मराठा हा बघायला तयार नाही. उमेदवारी द्यायला तयार नाही, ग्रामपंचायती मध्ये सुद्धा उभा करायला तयार नाही. गरीब मराठा समाजाला आरक्षणाच्या माध्यमातून जो फायदा होणार होता, त्याच ताट जर कोणी काढल असेल तर ते भाजपने काढलय हे आपण लक्षात घ्या. आता श्रीमंत मराठा तोंड देखलं लढण्याच नाटक करीत आहे.” तसेच, ‘माझं आव्हान आहे शरद पवार आणि या सगळ्या मंडळींना, मराठा आरक्षणाचा मुद्दा कोर्टाच्या ऐरणीवर तुम्ही कसं आणणार आहात ते आधी सांगा. मी गरीब मराठ्यांना आवाहन करतो की तुम्ही वंचित सोबत या, गरीब मराठ्यांच्या सवलतीचा प्रश्न गव्हर्नर च्या माध्यमातून पुनः कोर्टाच्या टेबलवर घेऊन जाऊ.’ असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

मोदींना तिहार जेल मध्ये कैद केल्याशिवाय राहणार नाही –
जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांनी बंगालच्या निवडणुकीत सांगितले होते की तुम्ही जर मोदींना निवडून दिल तर तुमचा व्यापार हा गुजरात्याला जाईल. हे लुटीच सरकार आहे. सगळ्यात मोठा चोर कोणी असेल तर इथला नरेंद्र मोदी आहे. अजून त्याच्या चोऱ्यांच्या कहाण्या आम्ही सांगितल्या नाहीत. ना खाऊंगा ना खाणे दुंगा अस म्हणणारा फक्त गुजरात्यांनाच खायला घालतो आणि दुसऱ्याच्या ताटातल काढतो. यांनी इतरांना तिहार जेल दाखवल आहे. आम्ही मोदींना तिहार जेल मध्ये कैद केल्याशिवाय राहणार नाही. मागील सरकार असताना दोन लाख कोटी खाल्ले असे मीडिया सांगत होता तर आता मोदींनी पंधरा हजार कोटी खाल्ले ते सुद्धा माध्यमांनी दाखवल पाहिजे. सगळे चॅनल हे मोदींनी अडानी आणि अंबानी यांना विकत घ्यायला लावले आहेत. त्यामुळे टिव्ही मध्ये मोदी विरोधात बातम्या येत नाही असा आरोपही त्यांनी केला.

आरएसएस आणि भाजपावर टीका –
“तुम्ही मला सत्ता द्या मोहन भगवतला सुद्धा जेल मध्ये टाकू. तुम्हाला शस्त्र बाळगण्याचा अधिकार कोणी दिला. एके 47, शस्त्र त्यांच्या पुजेमध्ये दिसतात. हे हत्यार आरएसएस कडे आले कोठून असा प्रश्न बाळासाहेबांनी विचारला. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेवर हत्याराचे मार्केट आहे. तिथूनच हे शस्त्र मणिपूरची परिस्थीती ही देशामध्ये सुद्धा होऊ शकते” अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. तसेच, “निवडणूक कधीही लागू शकते. 2 हजाराच्या नोट बंद केल्या तेव्हाच मी म्हणालो होतो निवडणूक लवकर लागू शकतात. कारण विरोधी पक्षांची आर्थिक कोंडी करून, तयारीला वेळ न देता निवडणुका लावण्याचे चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे प्रचार करायला वेळ मिळेल न मिळेल पण तुम्ही आताच निर्धार करा की माझं मत हे भाजप विरोधातच राहणार!”

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– Breaking! पवना नदीकाठच्या नागरिकांना महत्वाची सुचना, लगेच वाचा
– मुक्काम पोस्ट माळेगांव खुर्द!! अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आदिवासी बहुल भागात नवीन पोस्ट ऑफिसचे उद्घाटन
– मोठी बातमी! पवनानगर भागातील प्रसिद्ध कृषी व्यवसायिकाच्या घरी 14 लाखांची घरफोडी, परिसरात खळबळ


dainik maval jahirat

Previous Post

‘इलेक्ट्रिकल टेक्निशियन यांना चांगली पगारवाढ देण्यासाठी सरकार प्रयत्नशील, लवकरच निर्णय’

Next Post

‘पवना धरणातील पाणी पाहिजे पण पवना नदी नको, असं का?’, पवनमावळची जीवनदायिनी पुढे बनतेय मैलावाहिनी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
pavana-river-pollution

'पवना धरणातील पाणी पाहिजे पण पवना नदी नको, असं का?', पवनमावळची जीवनदायिनी पुढे बनतेय मैलावाहिनी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala world-famous Lonavala Chikki receives GI Tag century-old tradition gains global recognition

लोणावळा येथील जगप्रसिद्ध “लोणावळा चिक्की”ला ‘जीआय टॅग’ ; शतकभराच्या परंपरेला मिळाली जागतिक ओळख

July 20, 2026
Tourist-Places-Maval-Taluka

रिमझिम पावसाने मावळचा निसर्ग फुलला ; निर्बंध हटल्यामुळे पवना, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी

July 20, 2026
Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
non-venomous Gajara snake Indian Smooth Snake considered extremely rare found at Kanhe Maval

मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)

July 17, 2026
Work begins on Namo Udyan in Talegaon Dabhade groundbreaking ceremony in presence MLA Sunil Shelke

तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

July 17, 2026
Paying tribute at memorial pillar on occasion death anniversary of late Umeshbhai Shetty Lonavala Shiv Sena

Lonavala : शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन

July 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.