Dainik Maval News : श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्ताने सालाबादप्रमाणे यावर्षी देखील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक केंद्र शाळा कान्हे याठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीच्या पुढाकाराने सुंदर नियोजन करून “दहिहंडी उत्सव” साजरा करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहाने दहिहंडीचा कार्यक्रम घेण्याबाबत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समीर सातकर, उपाध्यक्षा रेणूका सातकर तसेच सदस्य आरती भाळवणे, स्वप्नाली आरोटे व इतर सर्व सदस्यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका सुकेशिनी कोले यांच्याशी चर्चा करुन नियोजन केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
त्याप्रमाणे शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहभागातून सर्व विद्यार्थ्यांना राधा, कृष्णाच्या सुंदर वेशात नटूनथटून येण्यासाठी सुचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे प्रत्येक वर्गातून बहुतेक मुलेमुली छान रंगीत कपडे परिधान करुन मुले “कृष्ण “आणि सुंदर साड्या नेसून मुली “राधा “बनून आलेल्या होत्या. शाळा आणि व्यवस्थापन समितीकडून प्रत्येक वर्गाला बक्षिसे जाहीर करण्यात आलेली होती.
ढोल ताशा आणि दहाहंडीच्या गाण्याचा तालावर पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना थर लावण्याची संधी देण्यात आली. यात मुलींनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी दहिहंडी फोडण्यात बाजी मारत प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवले. इयत्ता सातवीतील पियूश सातकर याने वर्गाच्या वतीने बक्षिसाचा स्वीकार केला. शाळेतील सर्व मुलामुलींनी आजच्या दहिहंडी उत्सवाचा मनमुराद आनंद नाचून बागडून साजरा केला.
सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यात शाळेच्या मुख्याध्यापिका कोले, नवले सर, सांगळे सर, काळडोके सर, वाव्हळ मॅडम, गाढवे मॅडम, बारवे मॅडम, श्रीमती मधे मॅडम, रणदिवे मॅडम यांनी सहकार्य केले. तर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समीर सातकर, सदस्य कोंडीबा सातकर, सचिन वीरकर, उपाध्यक्षा रेणूका सातकर, आरती भाळवणे, स्वप्नाली आरोटे, कुंदा चौरे, नंदिता दास, पूजा जांभूळकर, रोहिणी वाघमारे आणि पालक महिलांनी पुढाकाराने सर्व नियोजन करुन संपूर्ण कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
शाळेतील सहशिक्षक खंडू शिंदे यांनी कार्यक्रमाचे संपूर्ण चित्रीकरण आणि फोटोसेशन केले. दादासाहेब खरात यांनी सर्व विद्यार्थी, पालक आणि आयोजक-संयोजकांचे मनापासून आभार मानले.
अधिक वाचा –
– पंचायत समिती मावळच्या शिक्षण विभागामार्फत तळेगावात तालुकास्तरीय प्रज्ञाशोध कार्यशाळा संपन्न । Maval News
– तळेगाव नगरपरिषदेकडून शहरातील नोंदणीकृत 378 दिव्यांग लाभार्थींना अनुदानाचे वाटप । Talegaon Nagar Parishad
– रेड्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू, मावळातील कुसगाव येथील घटना, कुटुंबीयांना शोक अनावर । Maval News