शिवसेना ( Shiv Sena ) पक्षाचे संस्थापक, शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray ) यांचा गुरुवारी (17 नोव्हेंबर) रोजी दहावा स्मृतीदिन ( Death Anniversary ) होता. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मावळ तालुक्यातही पवनानगर येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि सर्वसामान्य शिवसैनिक यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी त्यांच्या प्रतिमेचे पुजन करुन हिंदूहृदयसम्राटांना अभिवादन केले. तसेच, सर्वांनी यावेळी वृक्ष वाटप आणि वृक्षारोपण करुन बाळासाहेबांचा स्मृतीदिन साजरा केला. ( Balasaheb Thackeray Death Anniversary 2022 Plantation At Pavananagar Maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सदर कार्यक्रमाला शिवसेना तालुका उपप्रमुख अमित कुंभार , विकास कालेकर, शिवसेना पवनानगर शाखाप्रमुख किशोर शिर्के, युवासैनिक प्रविण वैष्णव, विक्की जव्हेरी, शिवाजी पवार, निवृत्ती कालेकर, दत्ता बहीरट, विजय भालेराव, रूपनवर सर, तांबोळी मॅडम, जव्हेरी मॅडम आणि इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते.
View this post on Instagram
तसेच जिल्हा रूग्णालयाच्या गिरिजा पाद्धे, संदिप कुलकर्णी, विजया नलावडे, दिपा खंटाळे, उत्तम ठाकर आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हापरिषद शाळेमधील विद्यार्थ्यांना महापुरुष स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल माहिती देण्यात आली. वृक्ष लागवडीसह वृक्षारोपणाचे फायदे सांगण्यात आले. महत्वाचे म्हणजे यावेळी विद्यार्थ्यांमध्ये कोरोना काळात सर्वांशी आत्मीयतेने ऑनलाईन संवाद साधणारे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल विद्यार्थ्यांचा बरीच माहिती असल्याचे आणि कुतूहल असल्याचे दिसून आले.
अधिक वाचा –
– अर्रर्रर्र… हे काय झालं! पुण्यात महिलेने राहुल गांधींच्या ऐवजी सावरकरांच्या फोटोवर उगारली चप्पल
– मतदार यादीत नाव नसलेले शेतकरीही लढवू शकतात बाजार समितीची निवडणूक; वाचा मंत्रिमंडळाने घेतलेले 15 निर्णय एका क्लिकवर