राज्यातील ग्रामपंचायत इमारतीच्या कामांसाठी निधी वाढवण्याचा तसेच बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम पंचायत योजनेलाही मुदतवाढ देण्याचा निर्णय आज, शुक्रवार (दि. 18 नोव्हेंबर) रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः होते. आता ही योजना 2027-28 या वर्षापर्यंत राबवण्यात येईल. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
स्वतंत्र इमारत नसलेल्या 2000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीना 15 लाख ऐवजी 20 लाख रुपये व 2000 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना 18 लाख ऐवजी 25 लाख अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली. तसेच, यापुर्वी ग्रामपंचायत स्वनिधीची असलेली अट देखील रद्द करण्यात आली आहे. ( Balasaheb Thackeray Smriti Matoshree Gram Panchayat Yojana Maharashtra Cabinet Decision 2023 )
ग्रामपंचायत बांधकामासाठी यापेक्षा अधिक निधीची आवश्यकता अतिरिक्त निधी केंद्र व राज्य शासनाच्या इतर योजना, वित्त आयोग निधी, जिल्हा ग्राम विकास निधी, स्थानिक विकास निधी (खासदार,आमदार निधी) इ. बाबींमधून देण्यात येईल. राज्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वत:चे कार्यालय नाही, अशा 4252 ग्रामपंचायतींना स्वत:चे कार्यालय बांधण्यासाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेस 2018- 19 ते 2021 – 22 या 4 वर्षांसाठी मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार 1748 ग्रामपंचायतींना स्वत:चे कार्यालय बांधण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. या ग्रामपंचायत इमारतींचे बांधकाम सुरु असून, याकरिता आतापर्यंत 3813.50 लाख रुपये इतका निधी खर्च करण्यात आला आहे.
अधिक वाचा –
– चंदनवाडी शाळेतील विद्यार्थ्यांची दिवाळी गोड; लायन्स क्लबकडून शैक्षणिक साहित्यांसह फराळ वाटप
– ‘रयत विद्यार्थी विचार मंच’कडून परंदवडी गावात गरीब – कष्टकरी आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी
– जनरल मोटर्सच्या कामगारांचे आंदोलन : महिलांनी काळ्या साड्या नेसून दिल्या मंत्री सुरेश खाडेंना भाऊबीजेच्या शुभेच्छा