मावळ तालुका काँग्रेस (आय) पक्षाच्या ज्येष्ठ नागरिक सेलच्या अध्यक्ष पदी बंडोबा मारुती मालपोटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना पक्षाचे तालुकाध्यक्ष यशवंतराव मोहोळ यांनी नियुक्ती पत्र दिले. यावेळी ज्येष्ठ नेते पै. चंद्रकांत सातकर, रामदास आप्पा काकडे, जिल्हा उपाध्यक्ष संभाजी राक्षे, जिल्हा सरचिटणीस रोहिदास वाळुंज, तालुका सांस्कृतिक सेना अध्यक्ष साधू आरडे, आदिवासी सेल तालुका अध्यक्ष बबन हेमाडे आदी जण उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
काँग्रेसची पत्रकार परिषद संपन्न :
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुका काँग्रेसकडून संघटना बांधणीसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी (दि. 8) तळेगाव दाभाडे येथे ही बैठक होणार असल्याची माहिती कँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते रामदास काकडे, चंद्रकांत सातकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक होणार असून तालुक्यातील आगामी सर्व निवडणुका काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. ( Bandoba Malpote appointed as Maval Taluka Senior Citizen Cell President of Congress Party )
अधिक वाचा –
– कुणाची दिवाळी, कुणाचं दिवाळं! मावळातील 29 ग्रामपंचायतींचा अंतिम, अचूक आणि सविस्तर निकाल, वाचा एका क्लिकवर
– गुलाल कुणी उधळला? एका क्लिकवर पाहा मावळातील निवडून आलेल्या आणि बिनविरोध निवडलेल्या 21 सरपंचांची यादी
– मावळ तालुक्यात भाजपाची सरशी! 10 ग्रामपंचायतींवर भाजपाचे ‘कारभारी’, गटातटाच्या राजकारणाचा राष्ट्रवादीला फटका