Dainik Maval News : पराजय स्वीकारायचा असतो अन् विजय झाला तर हुरळून जायचे नसते. हार आणि जीत या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मी पराजय स्वीकारला असून नव्या जोमाने मावळच्या जनतेसाठी काम करणार आहे, अशी ग्वाही बापूसाहेब भेगडे यांनी दिली. तळेगाव दाभाडे येथे सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते.
विधानसभा निवडणुकीत प्रचार यंत्रणेत घेतलेल्या परिश्रमाबद्दल कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासाठी सर्व पक्षीय अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी सर्वपक्षीय प्रमुख कार्यकर्त्यांची मंगळवारी तळेगाव दाभाडे येथे बैठक घेतली. यावेळी २६/११ दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सर्व मावळवासीयांनी जे प्रेम दाखवले ते आमदार पदापेक्षा खूप मोठे आहे. प्रामाणिकपणे काम करून मावळचे वैभव व संस्कृती जपण्याचे काम आपण सर्वांनी केले असल्याचे त्याच प्रमाणे खचून न जाता पुन्हा त्याच जोमात काम करा कसलीही गरज पडल्यास कधीही फोन करा, समस्त बंधू भगिनींनी केलेल्या अलोट प्रेमामुळे मी अपयशच विसरुन गेलो आहे. तुमचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. तुम्ही माझ्यासाठी घेतलेल्या कष्टाच्या ॠणातून मी कदापी मुक्त होणार नाही.मला काहीही कमवायचे नाही; मला फक्त तुमच्यासारखी प्रेमाची माणसं कमवायची आहेत आणि गावोगाव जाऊन सर्व नागरिकांचे आभार मानायचे आहेत असे बापूसाहेब भेगडे म्हणाले.
यावेळी माजी मंत्री बाळा भेगडे, पुणे पीपल्स को ऑप बँकेचे माजी अध्यक्ष,विद्यमान संचालक बबनराव भेगडे,माजी नगराध्यक्ष ऍड रवींद्र दाभाडे, माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे, वैशाली दाभाडे, पुणे जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती बाबुराव वायकर,जि प माजी सदस्य गुलाबराव वरघडे,पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर,माजी उपसभापती शांताराम कदम,भाजपा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब गुंड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(शरदचंद्र पवार गट) अध्यक्ष दत्तात्रय पडवळ, पंचायत समितीचे माजी सदस्य सचिन घोटकुले,माजी नगरसेवक संतोष भेगडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळके यांना भेटण्यासाठी मावळच्या कानाकोपऱ्यातून नागरिकांची गर्दी, महिला वर्गाची लक्षणीय उपस्थिती
– नवनिर्वाचित आमदार शंकरभाऊ मांडेकर यांनी घेतली आमदार सुनिल शेळके यांची भेट । Talegaon Dabhade
– स्तुत्य उपक्रम ! वडगाव मावळ शहरातील सर्व अंगणवाडी केंद्रातील ४५५ विद्यार्थ्यांना उबदार स्वेटर भेट । Vadgaon Maval