Dainik Maval News : आंबी, तळेगाव दाभाडे येथे डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालयामध्ये केंद्रीय मधमाशी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथम वर्षातील मुलांसाठी पाच दिवसीय मधुमक्षिका पालन प्रशिक्षण सुरू झाले आहे.
प्रशिक्षण सत्राच्या शुभारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सायली गणकर होत्या. त्यांनी, जगातील मधमाशी पालन सारखेच मुलांनी पण मधमाशी पालन करून वेगळाच व्यवसाय सुरु करावा, असे सांगितले.
- मधमाशी पालन प्रशिक्षणासाठी तज्ञ प्रशिक्षक प्रा. हेमंतकुमार डुंबरे हे असणार असून त्यांनी सांगितले की, प्रत्येक मुलांनी नोकरीच्या पाठीमागे न लागता काहींनी मधमाशी पालनासारखे व्यवसाय करावेत व स्वतः ची उन्नती करून घ्यावी.
प्रशिक्षण कार्यक्रम एकूण पाच दिवस असून कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयातील सर्व स्टाफ आणि प्रथम वर्षातील सर्व मुले उपस्थित होते. पाच दिवस कार्यक्रम संपल्यानंतर उपस्थित सर्व मुलांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जयवंत जाधव होते. कीटकशास्त्र विभागाचे प्रा. निलम बांगर आणि प्रा. पांडुरंग जगताप यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. प्रथम वर्षातील विद्यार्थीनी रिसालदार अंजलना हिने सूत्र संचालन केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! तळेगाव ते चाकण चार पदरी उन्नत मार्ग आणि समांतर चार पदरी रस्त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी
– फसवणुकीला माफी नाही..! बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर ; ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार
– चांगला निर्णय ! अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार
