मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे इथे दिनांक 9 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर या दरम्यान मधुमक्षिका पालन प्रशिक्षण वर्ग पार पडत आहे. फ्रेंड्स ऑफ नेचर हॉल (यशवंतनगर, तळेगाव दाभाडे) इथे या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या प्रशिक्षण शिबिराला मार्गदर्शक म्हणून प्रा हेमंतकुमार डुंबरे आणि प्रा निलम बांगर हे उपस्थित असणार आहेत. ( Beekeeping Training Class at Talegaon Dabhade Maval )
सदर प्रशिक्षण वर्गात उपस्थितांना केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (CBRTI Pune ) यांच्या अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षण काळात तीनही दिवस सकाळी साडेनऊ ते साडेपाच या वेळेत वर्ग भरवला जाईल. ज्या शेतकऱ्यांना खरोखरच मधमाशी पालन करायचे आहे, त्यांच्यासाठी ही खास पर्वणी असणार आहे. प्रशिक्षण शिबिराला येताना आधार कार्ड आणणे आवश्यक आहे.
प्रशिक्षण शिबिरात काय काय शिकायला मिळेल?
- मधमाशी पालनचा इतिहास व विविध जाती
- मधमाशीच्या पोळ्याची रचना, घटक व त्यांची कार्य
- मधमाशीपालन शेतीला पूरक जोडव्यवसाय कसा करावा?
- शुद्ध नैसर्गिक मधाचे उत्पादन कसे घ्यावे?
- मधमाशांद्वारे परागीभवन घडवून अन्नधान्य व फळबाग उत्पादनात लक्षणीय वाढ कशी करावी?
- मधमाशी जवळून पाहण्याचा व हाताळण्याचा दोन्ही दिवस सराव
- निसर्गात आढळणार्या मधमाश्या पेटीत भरण्याची कला व प्रात्यक्षिक
- मधमाशांचे शत्रु, रोग व त्यापासून संरक्षण
- अनुभवी मधपालकांची भेट, फार्म व्हिझिट व प्रात्यक्षिक
- प्रत्येकाला मधमाशी हाताळण्याची संधी
- परदेशातील मधमाशी पालन कसे केले जाते याबाबत माहिती
- मधमाशी आपल्याला काय देते व आपण मधमाशी पासून काय शिकावे?
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘त्याचा हसतमुख चेहरा असाच कायम स्मरणात राहील’, मावळच्या शहीद सुपुत्राच्या कुटुंबीयांचा प्रेरणादायी निर्णय
– पोलिसांची दबंग कामगिरी! लोणावळ्यात घरफोडी करणारी टोळी जेरबंद, एकाचवेळी दहा गुन्ह्यांची उकल, लाखोंचा मुद्देमाल जप्त
– ‘तळेगाव नगरपरिषदेच्या अकार्यक्षम मुख्याधिकाऱ्यांची बदली करा’, आमदार सुनिल शेळकेंचे नगरविकास विभागाला पत्र, वाचा