कामशेत येथे ग्रामदैवत श्री भैरवनाथ नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने दिनांक 6 ऑक्टोबर ते दिनांक 10 ऑक्टोबरपर्यंत भव्य भजन स्पर्धा पार पडली. विविध गटात झालेल्या या भजन स्पर्धेत शेकडो भजन मंडळांनी सहभाग नोंदवला होता. ( Bhajan Competition At Kamshet Winner Got Prizes )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
श्री भैरवनाथ महाराज नवरात्र उत्सव भजन स्पर्धेचे विजेते;
प्रथम क्रमांक – 11 हजार रुपये आणि पखवाज
विजेते – भैरवनाथ भजनी मंडळ, कुसगाव बु” आणि ताजुबाई भजनी मंडळ, ताजे
द्वितीय क्रमांक – 7 हजार रुपये आणि तबला
विजेते – राधाकृष्ण भजनी मंडळ, नायगाव आणि विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ, ताजे
तृतीय क्रमांक – 5 हजार रुपये आणि वीना
विजेते – नागनाथ भजनी मंडळ, औढे आणि वाघजाई भजनी मंडळ, देवले
चतुर्थ क्रमांक – 3 हजार रुपये आणि टाळ
विजेते – गोधनेश्वर भजनी मंडळ, राजमाची आणि माऊली भजनी मंडळ, वाकसई
विजेत्या भजनी मंडळांना बक्षिस आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती भेट देण्यात आली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद कदम यांनी केले, तर आभार अभिमन्यु शिंदे यांनी मानले. या स्पर्धेचे पर्यवेक्षक पंडित किरण परळीकर यांनी भैरवी गायनाने कार्यक्रमाची सांगता केली.
कामशेत येथे श्री भैरवनाथ महाराज नवरात्र उत्सव निमित्त भजन स्पर्धा संपन्न, विजेत्या भजन मंडळांना पारितोषिक वाटप#Maval #मावळ #Kamshet #कामशेत #भजनस्पर्धा #BhajanCompetition #Photo #फोटो #म
???? Abhimanyu Shinde pic.twitter.com/0Ntdmrq998— Dainik Maval दैनिक मावळ (@DainikMaval) October 12, 2022
कार्यक्रमाप्रसंगी जेष्ठ नेते माऊली शिंदे, माजी सभापती राजाराम शिंदे, जेष्ठ नेते शंकरनाना शिंदे, प्रगतशील शेतकरी शंकर शिंदे, माजी उपसरपंच गणपत शिंदे, गजानन शिंदे, वैभव शिंदे, राम माने, मुकुंद शिंदे, तुषार शिंदे, दिनेश शिंदे, अनिकेत शिंदे, रोशन शिंदे, महेश शिंदे, प्रसाद गाढवे आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.
अधिक वाचा –
पुजा शिंदे ठरल्या बेस्ट सेल्फी कॉन्टेस्ट 2022 च्या भाग्यशाली महादुर्गा विजेत्या I Vadgaon Maval
मावळकरांची उपचारासाठीची धावाधाव कमी होणार; कान्हे येथील उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम युद्ध पातळीवर सुरु