पवन मावळ मधील उर्से, आढे, सडवली, बऊर या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांसाठी पीएमआरडीए अंतर्गत 8 कोटी 35 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या कामाचा भूमिपूजन समारंभ रविवारी (दि. 10 मार्च) आमदार सुनिल शेळके आणि अन्य मान्यवर, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. तसेच उर्से गावातील विविध विकास कामांचे भूमिपूजन देखील करण्यात आले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मावळ तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, कार्याध्यक्ष साहेबराव कारके, माजी सरपंच बाळासाहेब कारके, जालिंदर धामणकर, भारततात्या ठाकूर, संचालक खरेदी विक्री शिवाजीराव असवले, नारायणराव ठाकर, पोलीस पाटील गुलाबराव आंबेकर, सुभाष धामणकर, बाळासाहेब धामणकर, उमेश बोडके, रशिद सय्यद, दामूशेठ ठाकूर, बाबा मुलाणी, अजित चौधरी, पिंटू सुतार, शिवाजी पडवळ, ज्ञानेश्वर कारके, अविनाश कारके, नवनाथ घारे, राजाराम सावंत, श्रीपत सावंत, सोमनाथ धामणकर आदी मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते. ( Bhoomi Pujan by MLA Sunil Shelke of road connecting Urse Adhe Sadvali Baur villages in pavan maval )
अधिक वाचा –
– पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील 13 पोलिस निरिक्षकांची नेमणूक, तळेगाव दाभाडे येथे ‘या’ दमदार अधिकाऱ्याची नेमणूक । Pimpri Chinchwad Police
– महावितरणच्या चाकण उपविभागाचे विभाजन; नवीन उपविभागासह दोन शाखा कार्यालयांची निर्मिती । Pune News
– कामशेत येथील पत्रकार चंद्रकांत लोळे यांचे प्रवासादरम्यान निधन । Journalist Chandrakant Lole passed away