पवन मावळातील रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ स्थानिक मान्यवरांच्या शुभहस्ते शुक्रवार (दिनांक 11 ऑगस्ट) संपन्न झाला. मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून या रस्त्यांच्या कामासाठी अर्थसंकल्प 2022-23 अंतर्गत सुमारे 2 कोटी 92 लक्ष निधी उपलब्ध झाला असून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्त्याचे काम करण्यात येणार आहे.
डोणे फाटा ते डोणे गावाकडे जाणारा रस्ता व डोणे फाटा ते ओव्हळे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे अशी मागणी आमदार सुनिल शेळके यांच्याकडे ग्रामस्थांकडून करण्यात येत होती. या मागणीची दखल घेत सद्यस्थितीत 3.75 मीटर असलेल्या रस्त्याचे रुंदीकरण करुन 5.50 मीटर रस्ता होणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. ( bhumi pujan ceremony of road work at done village in pavan mawal )
या भूमिपूजन समारंभास अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे जिल्हा सचिन घोटकुले, मा.सरपंच अमोल सावळे, अशोक साठे, शहाजी घोटकुले, शरद महाराज घोटकुले, चंद्रकांत पाथरट, चंद्रकांत चांदेकर, राहुल घारे, योगेश कारके, प्रकाश राजिवडे, रोहिदास सावळे, मनोज तुपे, अनिल राजिवडे, महिंद्रा सावळे, बाळु घारे, दिपक कारके,गणेश खिलारी, शेखर काळभोर, विशाल सावळे, अक्षय घोटकुले, देवा खोंडगे,समीर खिलारी, ऋषिकेश पशाले आदि. उपस्थित होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ब्रिटिशांची जुलमी राजवट दूर करुन भारतमातेला स्वातंत्र्य मिळवून देणारे ‘क्रांतिकारक हेच देशाचे खरे हिरो’ – व्याख्याते विवेक गुरव
– ज्येष्ठ नागरिक सेलच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते ॲड. निवृत्ती फलके यांची नियुक्ती । Talegaon Dabhade
– प्रहार रुग्णसेवक संजय गायखे यांना ‘आदिवासी लोकमित्र’ पुरस्कार प्रदान । Vadgaon Maval