कामशेत : पिंपळोली येथील ग्रामीण मार्ग-83 रस्त्याचा भूमिपूजन समारंभ स्थानिक मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाला. मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नातून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत या कामासाठी तीस लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पिंपळोली गावाकडे जाणाऱ्या या मुख्य रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली होती. विद्यार्थी, शेतकरी यांना या रस्त्याने प्रवास करणे अवघड झाले होते. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यासाठी निधी उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे. ( bhumi pujan of road work in pimpoli village maval funds by mla sunil shelke )
भूमिपूजन समारंभ प्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य दिपक हुलावळे, माजी चेअरमन बाळासाहेब भानुसघरे, सरपंच निलम सुतार, उपसरपंच पिंकी बालगुडे, सदस्य सिध्दार्थ चौरे, रेश्मा गायकवाड, ताईबाई केदारी, माजी सरपंच राम पिंपळे, विष्णू बोंबले, काळुराम पिंपळे, संदिप चौरे, सोपान पिंपळे, माजी सरपंच रमेश सुतार, पोलीस पाटील दिपाली बोंबले, अरुण केदारी, सुनिल गुजर, सहदेव केदारी, रोहिदास बालगुडे, सुशांत बालगुडे आणि ताजे, पिंपळोली, पाथरगाव येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
अधिक वाचा –
– बाळराजे असवले इंग्लिश मीडियम स्कूल आणि सरपंच चिंधू मारुती असवले हायस्कूलचा निकाल 100 टक्के
– पक्क्या लायसन्ससाठी मावळमध्ये ‘या’ दिवशी मेळाव्यांचे आयोजन, पाहा ठिकाण आणि तारीख