मावळ तालुक्याचे शेवटचे टोक असणाऱ्या सह्याद्री डोंगररांगांनी वेढलेल्या अत्यंत दुर्गम भागातील कळकराई गावापर्यंत स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच रस्ता होत आहे. रविवारी (दि. 24 डिसेंबर) रोजी कळकराई ते मोग्रज (ता. कर्जत) या जोडरस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या सुमारे दीड कोटी निधीतून मावळ, खेड आणि कर्जत तालुक्यांच्या सीमेवर असणाऱ्या कळकराई या दुर्गम भागातील गावात स्वातंत्र्यानंतर प्रथमच रस्ता होत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
विकासकामांपासुन वंचित असलेल्या या भागात रस्ता होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत या रस्त्याचे काम होणार असून सुमारे दीड किलोमीटर पेक्षा अधिकच्या रस्त्याचे काम या निधीतून होणार आहे. कामास तात्काळ सुरुवात केल्याने ग्रामस्थांनी आमदार शेळके यांचे आभार मानले आहेत. ( bhumipujan of new road from mograj village karjat taluka to kalkarai village maval taluka )
तसेच नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार शेळके यांच्या प्रयत्नातून या रस्त्यासाठी साडेसहा कोटी निधी मंजूर झाला असून लवकरच पुढील प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्षात कामास देखील सुरुवात होईल. त्यामुळे या भागाचा विकासाचा अनुशेष भरून निघणार असून पक्क्या रस्त्यांमुळे या भागातील दळणवळणास गती मिळणार आहे.
सदर भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी सावळा ग्रामपंचायतचे सरपंच नागू ढोंगे, सदस्य सचिन तळपे, चंद्रकांत कावळे, सूर्यकांत तळपे, सखाराम कावळे, भरत साबळे, लक्ष्मण कावळे, नारायण मालपोटे, मयूर नाटक, योगेश गायकवाड, सखाराम लाडके, बुधाजी कावळे, अशोक लाडके, पांडुरंग घुटे, लाला लाडके तसेच मोग्रज गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
अधिक वाचा –
– मावळ लोकसभेसाठी भाजपाने कंबर कसली! पिंपरी-चिंचवड शहरात भाजपा कोअर कमिटीची बैठक संपन्न, निवडणूकीसाठी केले खास नियोजन
– दैनिक मावळ ‘संवाद’ : ‘पिंपरी चिंचवड गाव ते महानगर’ पुस्तकाचे लेखक श्रीकांत चौगुले यांच्यासोबत खास बातचीत
– नाताळ सण विशेष : सांताक्लॉज नक्की कोण असतो? भगवान येशू ख्रिस्त, ख्रिसमस सण आणि सांताक्लॉजचं नातं काय? नक्की वाचा