Dainik Maval News : श्री एकविरा देवी पायथा मंदिर जवळील वेहेरगाव तलावात एका व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला. मंगळवारी (दि. 19) दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. तलावात एक युवक बुडाला असल्याची माहिती पोलीस पाटील अनिल पडवळ यांना मिळाली. त्यांनी ताबडतोब याची माहिती पोलीस प्रशासन आणि शिवदुर्ग रेस्कू टीमला दिली.
शिवदुर्गची टीम शोधकार्यासाठी घटनास्थळी दाखल झाली. काही वेळातच टीमने मुंबई येथील भूषण मंगेश म्हात्रे (वय 23) याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
सदर युवकाचा मृतदेह शोधण्यात शिवदुर्ग टीमचे प्रविण देशमुख, महेश मसने, कुणाल कडु, यश सोनवणे, अजय शेलार, गौरव कालेकर, चंदु बोंबले यांनी सहभाग घेतला. प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस निरिक्षक किशोर धुमाळ यांंच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरिक्षक सागर आरगडे करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ विधानसभा : तळेगाव शहरातील आमदार सुनील शेळके यांचा ‘रोड शो’ ठरणार ‘गेम चेंजर’
– मायबाप जनतेने मतदानरुपी आशीर्वाद द्यावेत ; प्रचाराची सांगता करताना आमदार शेळकेंचे भावनिक आवाहन
– ‘बापूसाहेब भेगडे यांचे सक्षम नेतृत्व लाभल्यास मावळ समृद्ध होईल’