तळेगाव दाभाडे येथील निसर्गमित्र, पक्षी अभ्यासक व नामवंत वन्यजीव छायाचित्रकार अभय तुळशीराम केवट यांना मावळ भागात एक दुर्मिळ पक्ष्याचे दर्शन झाले आहे. मार्च महिन्यात पहिल्या आठवड्यात हा पक्षी अभय केवट यांना दिसला, त्याची अचूक ओळख पटवण्याकरीता त्यांनी साधारण 20 दिवस त्या पक्ष्याचे निरक्षण केले. त्याचे अधिवास आणि त्याचे वर्तन याचा अभ्यास करून त्या पक्षी ची नेमकी प्रजाती ओळखून काढली. तसेच या पक्ष्याची पुणे जिल्हा व पश्चिम घाटातील भागात प्रथमच नोंद झाली असून या आधी महाराष्ट्र राज्यात फक्त 2 वेळा आढळुन आला आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
लालकंठी तिरचिमणी किंवा लालकंठी चरचरी : Red Throated Pipit ( शास्त्रीय नाव /Scientific Name :- Anthus Cervinus) नावाचा हा पक्षी उत्तर युरोप North Europe आणि Palearctic पेलीआर्कर्टिक व उत्तरीय अलास्का Northern Alaska भागातील एक चिमणी कुळातील पक्षी आहे. हा एक खूप लांब स्थलांतर करणारा पक्षी असून, हा पक्षी हिवाळ्यात आफ्रिका, दक्षिण व पूर्व आशिया आणि अमेरिकेकडील पश्चिमी समुद्रकिनारी स्थलांतर करतो. ( Bird Watcher And Wildlife Photographer Abhay Tulshiram Kewat Found Out Red Throated Pipit In Maval Taluka )
– भारतात हा पक्षी कधी कधी अंदमान बेटावर आढळतो.
– हा पक्षी आकाराने साधारण चिमणी पेक्षा थोडा मोठा आणि परीट पक्षी सारखा असतो
– याचे खाद्य गवतावरी छोट छोटे कीटक व आळ्या आहेत.
– प्रजनन पूर्व काळात या पक्षी च्या चेहऱ्यावर व गळ्याभोवती लालसर तपकिरी रंग येतो म्हणून याचे नाव Red Throated Pipit असे पडले आहे.
– हा पक्षी साधारणपणे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठड्यात reverse Migration म्हणजेच परतीचा प्रवासाला सुरवात करतात.
या पक्षी चे दर्शनामुळे पक्षी प्रेमी व पक्षी अभ्यासक यांच्यात उत्साही वातावरण आहे.
“या पक्षी दर्शनाने एक गोष्ट निदर्शनात येते की मावळातील पक्षी संपदा अजुनही टिकून आहे आणि अजूनही मावळ हा वन्यजीव आणि दुर्मिळ पक्षींचे स्वर्गच आहे असे याने सिध्द होते” असे मत अभय तुळशीराम केवट यांनी व्यक्त केले.
अधिक वाचा –
– बालपण समृद्ध करणारी, चिऊताई…! तुझ्यासाठी दोन ओळी । World Sparrow Day
– वडगाव शहरात गुढीपाडवा उत्सवानिमित्त भव्यदिव्य अशा शोभायात्रेचे आयोजन; 350 कलाकार आणि बरंच काही, वाचा अधिक
– सावधान, तो परत येतोय! महाराष्ट्रात कोरोना पुन्हा पसरतोय हातपाय, मुंबई-पुणे भागात परिस्थिती चिंताजनक