इंद्रायणी महाविद्यालयाच्या ( Indrayani Mahavidyalaya ) नवीन इमारतीच्या बांधकामात राजकारण करून कोणी अडथळा आणत असेल तर विद्यालयाचा माजी विद्यार्थी म्हणून पूर्ण ताकदीने संस्थेच्या मागे उभा राहणार, असा इशारा मावळचे ( Maval Taluka ) माजी आमदार, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे ( Bala Bhegade ) यांनी दिला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
माझ्या सारख्या असंख्य विद्यार्थी-विद्यार्थीनींना घडवण्याचे काम या इंद्रायणी महाविद्यालयाने केले असून, मावळ भूषण माजी आमदार कृष्णराव भेगडे साहेब आणि स्व. केशवराव वाडेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष मा रामदास काकडे आणि कार्यवाह मा चंद्रकांत शेटे यांच्या नेतृत्वात इंद्रायणी महाविद्यालयात संपूर्ण मावळ तालुक्यातील 7000 ते 8000 विद्यार्थी येथे शिक्षण घेतात, अशी माहिती बाळा भेगडे यांनी दिली. ( BJP Bala Bhegde Criticizes MLA Sunil Shelke on Indrayani College Talegaon Dabhade Building Construction )
तसेच, भविष्याचा विचार करता संस्थेने इंद्रायणी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे काम सुरु केले असता, विद्यमान आमदार जाणीवपूर्वक जिल्हाधिकारी यांच्या मार्फत संस्थेचे नवीन बांधकाम बंद पाडण्यासाठी चौकशी लावतात, असा आरोपही बाळा भेगडे यांनी केला. आम्ही सर्व आजी-माजी विद्यार्थी संपूर्ण ताकदीने संस्थेच्या पाठीशी भक्कम पणे उभे राहू, असे इंद्रायणी महाविद्यालयाच्या भेटी दरम्यान बाळा भेगडे म्हणाले.
अधिक वाचा –
– “तेंडूलकरच्या 10 हजार धावांपेक्षा सावरकारांनी भितींवर लिहिलेल्या 10 हजार ओव्यांचे अधिक कौतूक वाटले पाहिजे”
– Video : खळबळजनक! शिवसेना नेत्याची चारचौघात हत्या, मंदिराबाहेर आंदोलन करत असतानाच गोळीबार