पंजाबमध्ये शिवसेना नावाची संघटना चालवणारे दिग्गज नेते सुधीर सुरी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. सुधीर सुरी हे अमृतसरमधील एका मंदिराबाहेर धरणे आंदोलनाला बसले होते. त्यावेळी गर्दीतील एका व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले, ज्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. ( Shiv Sena Leader Sudhir Suri Dies After Being Shot At Punjab Amritsar )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सुधीर सुरी अमृतसरमधील गोपाळ मंदिराबाहेर निदर्शने करत असताना त्यांच्यावर गोळीबार झाला. या मंदिरातील काही देवीदेवतांच्या मूर्तींची विटंबना झाल्याच्या वृत्तामुळे ते या मंदिराबाहेर निदर्शने करत होते. त्याचवेळी गर्दीमधील एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केला. हा व्यक्ती तेथील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असल्याचे सांगितले जात आहे.
https://twitter.com/Homidevang31/status/1588497518442483712?s=20&t=pTnYIFTmcGlFgYeKuLePTQ
https://twitter.com/its_ab_96k/status/1588497524444532736?s=20&t=pTnYIFTmcGlFgYeKuLePTQ
दरम्यान, मागील काही दिवसांपासून सुधीर सुरी यांच्यावर हल्ल्याची योजना करण्यात येत होती. दिवाळीमध्येच त्यांच्यावर हल्ला करण्यात येणार होता. गेल्या माहिन्यात पोलिसांनी काही गँगस्टरला अटक केली होती. यावेळी चौकशीदरम्यान आरोपींनी खुलासा केला होता.
अधिक वाचा –
– “तेंडूलकरच्या 10 हजार धावांपेक्षा सावरकारांनी भितींवर लिहिलेल्या 10 हजार ओव्यांचे अधिक कौतूक वाटले पाहिजे”
– तळेगाव दाभाडे येथे 1 ते 4 डिसेंबरपर्यंत स्वातंत्र्यसमर महानाट्य, मावळमधील साडेतीनशे कलाकारांचा समावेश I Talegaon Dabhade