लोणावळा येथून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. लोणावळ्यातील प्रसिद्ध भुशी डॅम धरणाजवळ पुण्यातील पाच जण बुडाल्याची माहिती मिळत आहे. भुशी धरण आजच (दि. 30 जून) दुपारच्या सुमारास ओव्हरफ्लो झाले होते. दरम्यान दोन दिवसांपासून लोणावळ्यात पर्यटकांचा ओढा आहे. अशात रविवारी पुण्यातील एकाच कुटुंबातील 5 जण भुशी डॅमजवळील धबधब्याखाली पर्यटनासाठी गेले होते, परंतु पाण्याचा प्रवाह वाढल्याने ते पाण्यात वाहून गेले अशी माहिती मिळत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
वाहून गेलेले पाचही एकाच कुटुंबातील होते. पुण्यातील सय्यदनगर भागातील हे कुटुंब होते. वाहून गेलेल्या पाचातील दोघांचे एक महिला आणि एक मुलगी यांचे मृतदेह सापडले असून तिघांचा शोध सुरू आहे, अशी माहिती मिळत आहे. लोणावळ्यात पावसाळी पर्यटन आता कुठे सुरू झाले आहे, अशात या घटनेने पर्यटनाला गालबोट लागले आहे. रेस्कू टीम आणि पोलिस घटनास्थळी असून सर्च ऑपरेशन सुरू आहे. अधिक माहिती लवकरच प्राप्त होईल.
सविस्तर माहिती – पुण्यातील हडपसर येथील सैदनगर मधील अन्सारी कुटुंबातील काहीजण रविवारी भुशी धरणावर पावसाळी पर्यटनासाठी गेले होते. यावेळी धरणाच्या मागील बाजूस असणाऱ्या धबधब्याखाली भिजण्यासाठी म्हणून हे सर्वजण त्याठिकाणी गेले. दुपारी 12.30 वाजता ते या धबधब्याच्या प्रवाहात उतरले. मात्र पाण्याच्या प्रवाहाचा वेग वाढल्याने या कुटुंबातील एकूण 7 जण पाण्यासोबत धरणाच्या मुख्य डोहात वाहून गेले. यातील एक पुरुष आणि एका मुलीला पाण्यातून बाहेर पडण्यात यश मिळाले. मात्र दुर्दैवाने 4 ते 13 वर्ष वयोगटातील तीन मुली व एक मुलगा तसेच एका महिला पाण्यातून बाहेर पाडण्यात अपयशी ठरले.
अधिक वाचा –
– माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला हजेरी लावणारे एकनाथ शिंदे पहिले मुख्यमंत्री, फुगडी खेळली, इंद्रायणी स्वच्छतेचे दिले वचन
– वडगाव शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे टपरी आणि पथारी धारकांचे आश्वासन । Vadgaon Maval
– मोठी बातमी ! शिलाटणे गावाजवळ रात्री भीषण अपघात, सुदैवाने जिवितहानी नाही, परंतु…