व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! किशोर आवारे यांच्या हत्येप्रकरणी आमदार सुनिल शेळके यांसह सात जणांवर गुन्हा दाखल, तालुक्यात खळबळ

जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर शुक्रवारी (दिनांक 12 मे) दुपारच्या सुमारास तळेगाव नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर प्राणघातक हल्ला करण्यात आला, ज्यात त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 13, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, शहर
मोठी बातमी! किशोर आवारे यांच्या हत्येप्रकरणी आमदार सुनिल शेळके यांसह सात जणांवर गुन्हा दाखल, तालुक्यात खळबळ

जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर शुक्रवारी (दिनांक 12 मे) दुपारच्या सुमारास तळेगाव नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर प्राणघातक हल्ला करण्यात आला, ज्यात त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

भरदिवसा दुपारच्या सुमारास नगरपरिषद कार्यालयासमोर झालेल्या या घटनेने तळेगाव शहरात तणाव असून मावळ तालुक्यात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. अशात किशोर आवारे यांच्या मातोश्री तथा तळेगाव नगरीच्या माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांनी दिलेल्या जबाबावरुन सात जणांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये मावळ तालुक्याचे विद्यमान आमदार सुनिल शेळके यांसह त्यांचे बंधू सुधाकर शेळके यांसह एकूण सात जणांचा समावेश आहे. किशोर आवारेंच्या हत्याप्रकरणात आता आमदार शेळकेंचेही नाव घेतले गेल्याने संपूर्ण मावळसह पुणे जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.

सुलोचना आवारे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत त्यांनी, आमदार सुनिल शेळके, उद्योजक सुधाकर शेळके, संदीप गराडे यांचा उल्लेख केला असून अन्य चार जण अशा सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Breaking News Case filed against MLA Sunil Shelke in murder of Kishore Aware )

हेही वाचा – प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेले किशोर आवारे यांचे निधन, मावळ तालुक्यात खळबळ । Kishor Aware Murder News

सुलोचना आवारे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की; आमदार सुनिल शेळके, सुधाकर शेळके व संदीप गराडे यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे असे किशोर आवारे यांनी मला सांगितले होते. मागील काही महिन्यांपासून त्यांच्यात खटका उडत होता. सामाजिक कार्यासह राजकारणात किशोर आवारे सक्रीय झाले होते. तसेच किशोर आवारे हे सुनिल शेळके यांचे प्रमुख राजकीय विरोधक होते. त्यांचे राजकीय वर्चस्व निर्माण होत होते, ज्यामुळे सुनिल शेळके यांना आणि त्यांच्या बंधूंच्या राजकीय वर्चस्वाला धोका निर्माण झाला होता. तसेच माझ्या चालकाला देखील सुधाकर शेळके यांनी जातीचावक शिविगाळ केली होती असे फिर्यादीत म्हटले आहे.

तसेच, वरील सर्वांनी संगनमत करुन तळेगाव नगरपरिषद कार्यालयाच्या परिसरात श्याम निगडकर व त्याच्या तीन साथीदारांनी किशोर आवारे यांच्यावर शुक्रवारी दुपारी बंदूकीतून गोळ्या झाडत व कोयत्याने वार करत त्यांची हत्या केली असल्याची फिर्याद सुलोचना आवारे यांनी दिली आहे. दरम्यान सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपीचे चेहरे समोर आले आहेत. प्रत्यक्ष साक्षीदार देखील उपलब्ध असल्याने आरोपींच्या मागावर क्राईम ब्रांचची पथके रवाना करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त पद्माकर घनवट व काकासाहेब डोळे यांनी दिली.

अधिक वाचा –
– आंदर मावळातील नागाथली गावात गोठ्याला आग लागल्याने सहा म्हशींचा होरपळून मृत्यू
– ‘चांदणी चौकातील उड्डाण पुलाला मुळशी सत्याग्रहाचे नायक सेनापती बापट यांचे नाव द्या’, सुप्रिया सुळेंची मागणी


Previous Post

आंदर मावळातील नागाथली गावात गोठ्याला आग लागल्याने सहा म्हशींचा होरपळून मृत्यू

Next Post

आठवडे बाजाराच्या दिवशी उपनगराध्यक्षा स्वतः रस्त्यावर उतरल्या अन् 100 टक्के कर वसूल झाला । वडगाव मावळ

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Vadgaon-Maval-saili-mhalaskar

आठवडे बाजाराच्या दिवशी उपनगराध्यक्षा स्वतः रस्त्यावर उतरल्या अन् 100 टक्के कर वसूल झाला । वडगाव मावळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.