व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘आमच्या शेतकऱ्यांचे रक्तरंजित पाणी तुम्हाला प्यायचे आहे का?’, पवना जलवाहिनी प्रकल्प कायमचा रद्द करा, नाहीतर…

भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी पावसाळी अधिवेशनात पवना जलवाहिनी प्रकल्पाचा मुद्दा उचलून धरत ही योजना पुन्हा सुरु करण्याची मागणी केली होती.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
August 4, 2023
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, शहर
Pavaba-Jalvahini

Photo Courtesy : Team Dainik Maval


भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी पावसाळी अधिवेशनात पवना जलवाहिनी प्रकल्पाचा मुद्दा उचलून धरत ही योजना पुन्हा सुरु करण्याची मागणी केली आणि पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाकरिता आग्रह धरला. त्यांच्या या मागणीला लगेचच मावळ तालुक्यातून विरोध होऊ लागला असून पहिला विरोध हा महेश लांडगे यांच्या पक्षातून अर्थात भाजपाकडून झाला. त्या पाठोपाठ आता अन्य पक्ष, संघटना यांनीही प्रकल्प सुरु करणे तर दुसरच, हा प्रकल्प रद्द करा, अशी मागणी केली आहे. शिवसेना पक्षाची युवा शाखा असलेल्या युवासेनेमार्फत याबाबत तहसीलदार मावळ विक्रम देशमुख यांना पत्र देण्यात आले आहे. ज्यात, आमच्या शेतकऱ्यांचे रक्तरंजित पाणी तुम्हाला प्यायचे आहे का? असा खरमरीत सवाल केला आहे. ( cancel pavana aqueduct project permanently demand by maval shiv sena yuvasena branch )

काय म्हटलंय पत्रात?

“दिनांक 9 ऑगस्ट 2011 रोजी पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाविरोधात शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना आंदोलक शेतकऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार केला आणि या गोळीबारात तीन शेतकरी शहीद झाले. अनेक आंदोलक शेतकरी जखमी झाले. तेव्हापासून आजतागायत हा प्रकल्प रद्द करा म्हणून मावळ शिवसेनेची आग्रही भूमिका होती. जोपर्यंत बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायम स्वरूपी रद्द होत नाही तोपर्यंत ही भुमिका कायम राहील. आमचा पिंपरी-चिंचवडला पाणी देण्यास विरोध नाही, परंतू बंदिस्त जलवाहिनीतून पाणी देण्यास विरोध कायम आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने देखील जलवाहिनी प्रकल्प करण्यासंदर्भातील भूमिका घेऊ नये, अन्यथा यापुढील आंदोलन हे पिपरी चिंचवड महानगरपालिकेत केले जाईल. आमचे तीन शेतकरी या बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प विरोधी आंदोलनात शहीद झालेत. आमच्या शेतकऱ्यांचे रक्तरंजित पाणी तुम्हाला प्यायचे आहे का? तरी आम्ही आपणास निवेदन करत आहोत की, स्थानिक शेतकऱ्यांची या प्रकल्पासंदर्भात जी भूमिका आहे, तीच आमची भूमिका आहे. म्हणून याबाबत आपण लक्ष घालून पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प रद्द करावा, ही नम्र विनंती.”

असे पत्र तहसीलदार विक्रम देशमुख यांना युवासेना मावळ तालुका यांच्या वतीने देण्यात आले आहे. हे पत्र देताना युवनासेनेचे मावळ तालुका अध्यक्ष विशाल हुलावळेसह अन्य सहकारी कार्यकर्ते उपस्थित होते. ( cancel pavana aqueduct project permanently demand by maval shiv sena yuvasena branch )
दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– भूमिपुत्रांसाठी राष्ट्रवादीचा एल्गार! ‘मावळमध्येच स्थानिक तरूणांना रोजगार मिळावा’, तहसीलदार आणि आमदारांना निवेदन
– पुण्यात तलवारीने दहशत निर्माण करून पसार झालेल्या आरोपीला तुंग किल्ला परिसरातून अटक

– औरंगाबादमधून अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीची कामशेत पोलिसांकडून चिखलसे गावाजवळ सुटका; अट्टल आरोपी अटकेत


Previous Post

पाचाणे, ओवळे, बेडसे गावातील शाळांना संगणक संच भेट; युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेश वाघोले यांचा स्तुत्य उपक्रम

Next Post

खुशखबर! राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत गट-क संवर्गातील 19 हजार 460 पदांची मेगा भरती जाहीर, लगेच पाहा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
zilla-parishad-maharashtra

खुशखबर! राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत गट-क संवर्गातील 19 हजार 460 पदांची मेगा भरती जाहीर, लगेच पाहा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.