मावळ तालुक्यातील शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 17 वर्षीय अल्पवयीन युवतीचे फोटो तिच्या परवानगीशिवाय इन्स्टाग्रामवर टाकून ‘आय लव्ह यू’ असे लिहिणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. अल्पवयीन तरुणीने शिरगाव पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीवरुन आरोपी अमोल भोसुरे (धानुरी, शिरुर) यावर पोलिसांनी भादवी कलम 364 (ड) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ( Case Has Been Registered Against Young Man For Harassing Minor Girl By Uploading Her Photos On Instagram )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी अल्पवयीन मुलीचे फोटो तिच्या परवानगीशिवाय स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वेळोवेळी अपलोड करुन फिर्यादीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असेल कृत्य केले असल्याकारणाने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नसून सदर प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरिक्षक गाडीलकर हे करत आहेत.
अधिक वाचा –
– अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला लोणावळा येथून अटक
– तळेगाव दाभाडे शहरातील पाण्याची समस्या लवकरच दूर होणार, युद्ध पातळीवर पाणी योजनेचे काम सुरु