Dainik Maval News : गहूंजे (ता. मावळ) येथील लोढा बेलमेंडो सोसायटीत किरकोळ वादातून अल्पवयीन मुलांना मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष किशोर भेगडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून शिरगाव पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. २८) सायंकाळी हा प्रकार घडला. येथील सोसायटीतील मुलांनी सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये पार्टी ठेवली होती. त्यावेळी काही मुलांनी किशोर भेगडे यांच्या मुलाला पार्टीत येऊ नको, असे म्हटले. ही बाब भेगडे यांच्या मुलाने त्यांना सांगितल्यानंतर संतापलेल्या किशोर भेगडे यांनी संबंधित मुलाना क्लब हाऊस मध्ये गाठून मारहाण केली, हा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
ह्या घटनेत एक अल्पवयीन मुलगा जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर जखमी मुलाच्या नातेवाईकांनी शिरगाव पोलिसांत याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार प्राप्त फिर्यादीवरून पोलिसांनी किशोर भेगडे यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलमांनुसार (जीवे मारण्याचा प्रयत्न) गुन्हा दाखल केला आहे. तसेच किशोर भेगडे यांना अटक केली असून त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
किशोर भेगडे हे मावळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविलेले बापूसाहेब भेगडे यांचे पुतणे असून ते तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगरसेवक, उपनगराध्यक्ष राहिलेले आहेत. तसेच त्यांच्यावर यापूर्वीही काही गुन्हे दाखल असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी दिली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत वडगाव मावळ येथे घरकुल आदेश आणि चावी वाटपाचा भव्य सोहळा संपन्न । Maval News
– देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पिंपरी महापालिकेत समावेश करण्याची मागणी ; खासदार बारणे यांनी घेतली संरक्षण मंत्र्यांची भेट
– पुणे शहरासह जिल्ह्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुणे ते अहिल्यानगर आणि तळेगाव-चाकण-उरुळी हे दोन रेल्वेमार्ग अस्तित्वात येणार
– श्रावण मास । नागपंचमी विशेष : श्रावणातील नाग-नरसोबाचा कागद म्हणजे प्राचीन मातृका पुजनाचे आधुनिक रुप