आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील दहिवली येथील आदिवासी कातकरी समाजातील 24 बांधवांना गुरुवारी (दिनांक 9 मार्च) रोजी जातीच्या दाखल्यांचे मोफत वाटप विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे करण्यात आले. कातकरी बांधवांसाठी महत्वाचा असणारा जातीचा दाखला त्यांना मोफत घरपोच उपलब्ध होत असल्याने कातकरी बांधवांनी आमदार सुनिल शेळके यांचे आभार व्यक्त केले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
कातकरी बांधव प्रामुख्याने ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांवर वास्तव्यास असल्याने त्यांना शासकीय कार्यालयात येऊन जातीचा दाखला मिळवण्यासाठीची किचकट प्रक्रिया पूर्ण करणे शक्य होत नाही. ही अडचण ओळखून आमदार सुनिल शेळके यांनी मागील अडीच वर्षांपासून तालुक्यातील प्रत्येक गावातील वाड्या-वस्त्यांवर जाऊन कागदपत्रांचे संकलन करत अर्ज भरुन घेण्यासाठी ‘आदिम कातकरी सेवा अभियान’ राबविले. त्याचा फायदा दोन हजारांहून अधिक कातकरी कुटुंबाना आजपर्यंत झाला आहे. ( Caste Certificate To Katkari Tribal Community In Maval Taluka Through MLA Sunil Shelke )
हेही वाचा – महिला दिनाचा योग; शिलाटणे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी जनाबाई कोंढभर बिनविरोध
यावेळी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुनिल येवले, नवनाथ पडवळ, वर्षा मावकर, राजूशेठ देवकर, माजी उपसरपंच शामराव गायकवाड, तानाजी पडवळ, किरण येवले, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस दहिवली विष्णू मावकर, निलेश पडवळ, गणेश मावकर, किसन मावकर, शरद मावकर, हरिभाऊ मावकर, कोंडू मावकर, अध्यक्षा महिला राष्ट्रवादी काँग्रेस रुपाली मावकर, कार्याध्यक्ष महिला राष्ट्रवादी काँग्रेस पूजा मावकर, सचिन वामन, अरविंद पाटील, संतोष जाधव आदी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– आढले खुर्द ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी पप्पू चांदेकर बिनविरोध, समर्थकांचा जल्लोष
– जागतिक महिला दिनी वडगाव शहरातील रणरागिणींचे रौद्ररुप, अवैध गावठी दारूचा कारखाना केला उध्वस्त