शिवसेनेसाठीची सर्वात मोठी बातमी आता समोर येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह म्हणजेच धनुष्यबाण गोठवले आहे. हे चिन्ह आता ना एकनाथ शिंदे गटाला मिळणार, ना उद्धव ठाकरे गटाला मिळणार आहे. सध्या हे चिन्ह दोन्ही गटांना वापरता येणार नाही. तसेच शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही, अशी माहिती समोर येत आहे. ( Central Election Commission Has Frozen Shiv Sena Bow And Arrow symbol )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
केंद्रीय निवडणूक आयोगाने नेमके काय म्हटले?
दोन्ही गटाला ‘धनुष्यबाण’ चिन्ह वापरता येणार नाही. तसेच दोन्ही गटाला शिवसेना हे नावही वापरता येणार नाही. मात्र, दोन्ही गटाला ठाकरे गट आणि शिंदे गट अशी नावे वापरता येऊ शकतात. तसेच अंधेरी पोटनिवडणुकीसाठी दोन्ही गटाला वेगळे चिन्ह देण्यात येईल, असेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
दोन दिवसांत नव्या चिन्हासाठी पर्याय सादर करा…
केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह तात्पुरत्या स्वरुपात गोठवले आहे. त्यामुळे आता ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांनाही हे चिन्ह वापरता येणार नाहीये. त्यांना सोमवारपर्यंत नवीन चिन्हासाठी पर्याय देण्याची मुदत देण्यात आली आहे. याचाच अर्थ अंतिम निर्णय नाही. हा तात्पुरता निर्णय आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयाने मागील काही दिवसांपासून धनुष्यबाण चिन्हाबाबत सुरू असलेला वाद या निमित्ताने तात्पुरता संपुष्टात आला आहे. तसेच निवडणूक आयोगाचा हा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जातो आहे. याचे कारण गेले अनेक दशके शिवसेना, धनुष्यबाण आणि ठाकरे या तीन नावांचा भावबंध जुळलेला आहे.
अधिक वाचा –
आख्ख्या महाराष्ट्राला ठाकरे-शिंदेंची चिंता, पण इकडे तर ठाकरे-शिंदे घरी लगीनघाई सुरु, विश्वास नसेल तर लग्नपत्रिका पाहा
देहुरोडमध्ये ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मारण्याचा कट’ ? एका फोनने खळबळ, वाचा संपूर्ण प्रकरण