भारतीय संस्कृतीत विवाह संस्कार हा अत्यंत महत्वाचा भाग मानला जातो. आयुष्याच्या पायरीवरील हा एक महत्वाचा टप्पा असतो. परंतु प्रत्येकाच्या जीवनात हा टप्पा आनंददायी ठरतो असे नाही. पती आणि पत्नीत यांच्या अनेक कारणांमुळे दुरावा वाढू लागतो, यातून हे पवित्र नाते ओहोटीकडे जाऊ लागते. आचार्य चाणक्य यांनी पती आणि पत्नी यांच्यातील नात्यात दुरावा वाढण्याची काही प्रमुख कारणे सांगितली आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
आचार्य चाणक्य हे उत्तम विद्वानांपैकी एक होते. त्यांनी प्रत्येक नातेसंबंधाचा सखोल अभ्यास केला होता. आचार्य चाणक्य मानतात की सुखी वैवाहिक जीवन असलेल्या व्यक्तीला नेहमी यश मिळतं. त्यामुळे जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर सर्वप्रथम तुमचे वैवाहिक जीवन सुखी करण्याचा प्रयत्न करावा. यासाठीच त्यांनी पती-पत्नी यांच्यात दुरावा वाढू शकतील, अशी काही कारणे सांगितली आहेत. ही कारणे प्रत्येक जोडप्याने तपासणे आवश्यक आहे. ( Chanakya Niti Reasons for estrangement between husband and wife )
पती-पत्नी दरम्यान सुसंवाद हवा – चाणक्य नीतिनुसार, ज्या व्यक्तीचे वैवाहिक जीवन तणाव, दुःख आणि अडचणींनी भरलेले असते, तो कितीही प्रतिभावान किंवा प्रभावशाली असला तरीही त्याच्या जीवनात नेहमीच निराशा आणि दुःख येतं. सुखी वैवाहिक जीवनासाठी पती आणि पत्नीमध्ये सामंजस्य असणे आवश्यक आहे. हे सामंजस्य वाढवण्यासाठी दोघांमध्येही योग्य संवाद होणे आवश्यक आहे. सुसंवादाच्या अभावाने नात्यात तेढ निर्माण होऊ शकते.
नात्यात विश्वास हवा – आचार्य चाणक्य यांच्या मते सुखी वैवाहिक जीवनासाठी विश्वास अत्यंत महत्वाचा आहे. विश्वासामुळे पती-पत्नीचे नाते घट्ट होते. दोघांनीही एकमेकांच्या भावनांचा पूर्ण आदर केला पाहिजे. तसेच सुसंवादामुळे हा विश्वास वाढायला मदत होते. विश्वास असलेले नाते कोणत्याही प्रसंगात टीकून राहते, तिथे दुरावा येण्याचा संबंध येतच नाही.
पती-पत्नीत प्रेमाचा ओलावा असावा – चाणक्य नीतिनुसार प्रेम ही कोणत्याही नात्याची पहिली अट असते. पती-पत्नीचे यांचे नाते हे तर सर्वात पवित्र नाते मानले जाते. या नात्यात खोटेपणा आणि दिखावा चालत नाही, तिथे निखळ प्रेम असणे आवश्यक आहे. या नात्यात प्रामाणिकपणा जेवढा अधिक तेवढे प्रेम वाढीस लागते आणि प्रेम अधिक असेल तर पती-पत्नीच्या नात्याची वीण अधिक घट्ट होत जाते.
महत्वाची टीप : वरील सर्व माहिती ही सामान्य गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे.
अधिक वाचा –
– लोकसभेत महाराष्ट्रातून 48 खासदार, 36 जणांनी घेतली मराठीत शपथ, तुमच्या खासदाराने कोणत्या भाषेत शपथ घेतली ? पाहा यादी
– मोठी बातमी ! काँग्रेस पक्षाच्या संसदीय दलाकडून राहुल गांधी यांची लोकसभेतील सभागृह नेतेपदी निवड । Congress MP Rahul Gandhi
– लोणावळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम अखेर सुरू । Lonavala News