चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना निवडून आणण्यासाठी झोकून देवून काम करावे. प्रचाराला केवळ तीन दिवस राहिले आहेत. त्यामुळे सर्व कामे बाजूला ठेवून प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (21 फेब्रुवारी) शिवसेनेच्या पदाधिका-यांना दिल्या.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचाराचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवारी रात्री पिंपरी-चिंचवड शहरात आले होते. त्यांनी शहरातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिका-यांच्या गाठीभेटी घेतल्या. मुख्यमंत्र्यांसोबत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, शिवसेनेचे विधीमंडळातील प्रतोद भरत गोगावले, शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील होते. ( Chief Minister Eknath Shinde Guidance To Shiv Sena Party Workers In Chinchwad Assembly By Election )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
थेरगाव येथे पदाधिका-यांची बैठक घेतली. शिवसेना उपनेते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, उपजिल्हाप्रमुख राजेश वाबळे, मावळचे जिल्हा संघटक अंकुश देशमुख, पिंपरी-चिंचवचे शहरप्रमुख निलेश तरस, जिल्हा संघटिका शैला पाचपुते, युवती संघटिका शर्वरी गावंडे, उपशहर प्रमुख बशीर सुतार, पिंपरी विधानसभा प्रमुख रुपेश कदम, चिंचवड विधानसभा प्रमुख सुरेश राक्षे, शहर संघटक सोमनाथ गुजर, रवींद्र ब्रह्मे, हाजी शेख, पिंपरी विधानसभा संघटक नरेश टेकाडे, संदीप पवार, निखील यवले, समन्वयक सुनील पाथरमल, चिंचवड विधानसभा संघटक रोहिदास दांगट, संतोष बारणे, सुदर्शन देसले, समन्वयक प्रदीप दळवी, उपविधानसभा संघटक राजेश अडसूळ, अंकुश कोळेकर, प्रशांत कडलग, महेश कलाल उपस्थित होते.
चिंचवडमधून भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या पाहिजेत. प्रचाराला केवळ तीन दिवस राहिले आहेत. त्यामुळे सर्व कामे बाजूला ठेवून झोकून देवून प्रचारात उतरावे. मतदारांपर्यंत पोहचा. रविवारी मतदानासाठी जास्तीत-जास्त मतदारांना बाहेर काढावे, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसैनिकांना दिल्या.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या विजयासाठी सर्व शिवसैनिक प्रचारात उतरले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री पहाटे चार वाजेपर्यंत काम करत असल्याचे पाहून शिवसैनिकांना आणखी काम करण्याची प्रेरणा मिळाली. शिवसैनिक तीन दिवस रात्रीचा दिवस करुन प्रचार करतील. ( Chief Minister Eknath Shinde Guidance To Shiv Sena Party Workers In Chinchwad Assembly By Election )
पहाटेचार वाजता मुख्यमंत्री भेटल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झोकून देवून काम करत आहेत. राज्याच्या विकासासाठी चोवीस तास काम करतात. मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्येक पदाधिका-यांशी संवाद साधला. सर्वांकडून चिंचवडचा आढावा घेतला. पहाटे चार वाजेपर्यंत मुख्यमंत्री शिंदे आढावा घेत होते. चर्चा करत होते. पहाटे चार वाजता मुख्यमंत्री भेटल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. पोटनिवडणुकीत पूर्ण ताकदिनीशी काम करण्याची ग्वाही सर्व पदाधिका-यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिली.
अधिक वाचा –
– खासदार बारणेंच्या वाढदिवसानिमित्त शरीरसौष्ठव स्पर्धा; सौरभ हिरवे ठरला ‘महाराष्ट्र श्री 2023’चा मानकरी
– ‘संस्कारक्षम माणूस हा संगतीतून घडतो’, वरसुबाई माध्यमिक विद्यालयात गणेश महाराज जांभळे यांचे सुश्राव्य व्याख्यान