राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
श्रीमान महासाधू मोरया गोसावी संजीवन समाधी मंदिर येथे चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचाराचा शुभारंभ प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला. ( Chinchwad Assembly By-Election Mahavikas Aghadi Candidate Vitthal Alias Nana Kate Campaign Started In Presence NCP State President Jayant Patil )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यावेळी मावळचे आमदार सुनिल शेळके, पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, गौतम चाबुकस्वार, प्रचार प्रमुख भाऊसाहेब भोईर, माजी महापौर संजोग वाघेरे पाटील, युवक प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, माजी महापौर मंगलाताई कदम, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, शिवसेना शहराध्यक्ष सचिन भोसले, काँग्रेस शहराध्यक्ष कैलास कदम, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, तसेच महाविकास आघाडीचे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अधिक वाचा –
– महाराष्ट्रच नव्हे तर राष्ट्रपतींनी 12 राज्यांचे राज्यपाल आणि 1 केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल बदलले, पाहा यादी
– सेवाधाम ट्रस्ट संचलित आश्रमशाळेचे स्नेह संमेलन उत्साहात; आमदार शेळकेंच्या हस्ते मुलांच्या वसतीगृह इमारतीचे उद्घाटन