मावळ तालुक्यातील मौजे माळवाडी इथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांत 5 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवार (दिनांक 26 फेब्रुवारी) रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. ( Clash between two groups in Malwadi Maval taluka case registered in Talegaon MIDC police )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई प्रशांत मधुकर सोरटे यांनी दिनांक 26 फेब्रुवारी रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी;
1) सोमनाथ आनंदा शिंदे (वय 51 वर्षे, रा. आंबीका पार्क तळेगाव स्टेशन ता मावळ जि. पुणे)
2) विशाल बाळु पारधे (वय 22 वर्ष रा. सिध्दार्थनगर तळेगाव दाभाडे ता मावळ जि.पुणे)
3) नितीन पाडुरंग धोतरे (वय 39 वर्ष रा. सिध्दार्थनगर तळेगाव दाभाडे ता मावळ जि.पुणे)
4) विकास जिजाबा येवले (वय 31 वर्ष रा. कान्हेवाडी ता मावळ जि. पुणे)
5) सागर तानाजी दिवसे (वय 32 वर्ष रा. कान्हेवाडी ता मावळ जि. पुणे)
यांच्यावर तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान स. कलम 160 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 26 फेब्रुवारी रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास मौजे माळवाडी गावच्या हद्दीतील हॉटेल इंद्रायणी समोर (ता. मावळ, जि. पुणे) इथे ही घटना घडली. आरोपींमध्ये अज्ञात कारणावरून वाद निर्माण झाला आणि त्यांनी फिर्यादी पोलिस शिपाई यांचे समोर एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करून भांडण केले, असे फिर्यादीत नमुद आहे. तसेच या आरडा ओरडामुळे सार्वजनिक शांततेचा भंग केला गेला. त्यामुळे त्यांच्यावर फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नसून पोना तारडे हे या प्रकऱणी पुढील तपास करत आहेत. ( Clash between two groups in Malwadi Maval taluka case registered in Talegaon MIDC police )
अधिक वाचा –
– लोणावळा शहरातील रिदम हॉटेलसमोर मध्यरात्री झालेल्या अपघातात दोन अनोळखी दुचाकीस्वारांचा मृत्यू
– घरातून निघून गेलेल्या तरुणाचा तळेगाव दाभाडे शहरातील तलावात मृतदेह आढळल्याने खळबळ