Dainik Maval News : जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या बीज सोहळ्यानंतर डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने व पद्मश्री, महाराष्ट्र भूषण डॉ श्री आप्पासाहेब धर्माधिकारी, डॉ श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार सोमवारी (दि.१७) श्रीक्षेत्र देहू आणि श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
सदर उपक्रमात पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील दीड ते दोन हजार श्रीसदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. “स्वच्छ देहू, पवित्र देहू” या संकल्पनेला बळ देत, सर्व श्रीसदस्यांनी देहू गाव मुख्य रस्ते, देहू मंदिर परिसर, इंद्रायणी नदी किनारा, गाथा मंदिर तसेच भंडारा डोंगरातील पवित्र स्थळे स्वच्छ केली.
- सकाळपासूनच श्रीसदस्य देहू आणि भंडारा डोंगर परिसरात पोहोचले. सुमारे दीडहजार श्रीसदस्यांनी अवघ्या दोन तासांत (सकाळी ६.०० ते ८.०० दरम्यान) श्रीक्षेत्र देहू परिसर स्वच्छ केला. यावेळी प्लॅस्टिक कचरा, पत्रावळी, तसेच अन्य कचऱ्याची सफाई करून परिसर स्वच्छ ठेवण्याचे महत्व लोकांपर्यंत पोहोचविण्यात आले.
संत तुकाराम महाराज यांचा पवित्र देहू स्थळ स्वच्छ आणि सुशोभित ठेवण्याचा संदेश दिला. डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान दरवर्षी विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबवते. यंदा संत तुकाराम महाराजांच्या बीज सोहळ्यानंतर देहू आणि भंडारा डोंगर येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. स्थानिक ग्रामपंचायत, प्रशासन, वारकरी संप्रदाय, आणि नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत ” प्रत्येकाने कर्तव्य म्हणून स्वच्छतेबाबत जागरूक रहात स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा” असा संदेश दिला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भंडारा डोंगरावरील मंदिराच्या उभारणीसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
– तुकाराम..तुकाराम.. नाम घेता कापे यम । लाखो भाविकांच्या उपस्थितीत संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा बीज सोहळा संपन्न
– पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय, रिंग रोड बाबत महत्वाची माहिती ; ‘या’ 13 गावात भूसंपादनाला वेग