आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे शनिवारी (दि. 29 जून) आळंदी येथून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले. माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाधीचे दर्शन घेतले. आळंदीतील माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला हजेरी लावणारे एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
हरिनामाच्या जयघोषात सुरू असलेल्या सोहळ्यात शिंदे यांनी तब्बल सव्वा दोन तास आनंद घेतला. तसेच वारकऱ्यांशी हितगूज करत फुगडी खेळण्याचाही आनंद घेतला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावात पार पडला. मुख्यमंत्री शिंदे यांनी माऊलींचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांना देखील प्रतिक्रिया दिली. ज्यात त्यांनी राज्यातील बळीराजा सुखी होऊ दे. त्याला सुखी समाधानाचे दिवस येऊ दे, असे साकडे घातल्याचं सांगितलं. ( CM Eknath Shinde attended Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohla at Alandi )
तसेच, ‘मी माझं भाग्य समजतो माऊली, पांढुरंग, विठ्ठल यांनी मला इथे येण्याची संधी दिली. यासाठी मी स्वतःला भाग्यशाली समजतो’, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी इंद्रायणी नदी प्रदूषणाचा आढावा घेतला. इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करणार, स्वच्छतेसाठी मी कटिबद्ध असून तसे वचन देखील शिंदे यांनी दिले.
पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, विभागीय आयुक्त डो. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, पिंपरी-चिंचवडचे चे पोलिस आयुक्त विनय कुमार चोबे, आळंदी नगरपालिकेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्यासह इतर विभागातील अधिकारी यावेळी उपस्थित होते. विभागीय आयुक्त पुलकुंडवार तसेच इतर वरिष्ठ अधिकारी यांनी आषाढी वारीसाठी केलेल्या उपाययोजनांची मुख्यमंत्री शिंदे यांना माहिती दिली.
अधिक वाचा –
– वडगाव शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे टपरी आणि पथारी धारकांचे आश्वासन । Vadgaon Maval
– मोठी बातमी ! शिलाटणे गावाजवळ रात्री भीषण अपघात, सुदैवाने जिवितहानी नाही, परंतु…
– सरप्राईज..! मावळ तालुक्यातील दहावी-बारावी उत्तीर्ण झालेल्या हजारो विद्यार्थ्यांना आमदार सुनिल शेळकेंचा सुखद धक्का