व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, February 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

विशेष लेख : कॉमेडियन राजू श्रीवास्तव याचे निधन… राजू गेला… पण जाता जाता खुप काही शिकवून गेला!

सहज चालता बोलता माणूस मृत्यूच्या काळदाढेत पोहोचला. कुणालाही विश्वास बसत नव्हता. अगदी राजूला सुद्धा. आणि म्हणूनच की काय, त्याने त्या काळ दाढेतून बाहेर पडण्यासाठी तब्बल 42 दिवस झुंज दिली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 21, 2022
in देश-विदेश
Raju-Shrivastava-Passes-Away

Comedian Raju Shrivastava Dies At 58


प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव ( Raju Srivastav ) याचे बुधवारी ( 21 सप्टेंबर 2022 ) रोजी रुग्णालयात निधन झाले. पण मरणापूर्वी तब्बल 42 दिवस त्याने मृत्यूशी झुंज दिली. दिनांक 10 ऑगस्ट 2022 रोजी व्यायामादरम्यान आलेला हार्ट अटॅक, त्यानंतर त्याला दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

सहज चालता बोलता माणूस मृत्यूच्या काळदाढेत पोहोचला. कुणालाही विश्वास बसत नव्हता. अगदी राजूला सुद्धा. आणि म्हणूनच की काय, त्याने त्या काळ दाढेतून बाहेर पडण्यासाठी तब्बल 42 दिवस झुंज दिली. ‘जगण्यासाठी रडायचं नाही तर लढायचं असतं’ या उक्तीप्रमाणे राजू दिवसेंदिवस अगदी प्राणपणाने लढत होता. लढत होता कुटुंबासाठी, चाहत्यांसाठी. त्याचे चाहते, कुटुंब, नातेवाईक सर्वजण त्याच्यासाठी प्रार्थनाही करत होते.

एक दिवस त्याचा व्हेंटिलेटर सपोर्ट काढल्याचे समजले आणि लाखो चाहत्यांच्या जीवात जीव आला. पत्नीशी काही शब्द बोलला, हे ऐकूण तर आता आपला राजू पुन्हा आपल्याला हसवायला रंगमंचावर येणार, अशी खात्री झाली. पण… पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते.. पुन्हा मागील आठवड्यात परिस्थिती बदलली.

ब्रेन डेड होईपर्यंत परिस्थिती बिघडली. डॉक्टरांचे अपडेट्स, कुटुंबीयांचे अपडेट्स सर्वांनाच चिंतेत टाकणार होते, अखेर बुधवारी सकाळीच ती अप्रिय वार्ता धडकली. सर्वांचा लाडका राजू काळाच्या पडद्याआड गेला. आयुष्यभर संघर्ष, आयुष्याच्या शेवटी संघर्ष, पण गुगल करुन पाहा हो… त्याच्या चेहऱ्यावर हास्याशिवाय काहीच दिसत नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Raju Srivastav (@rajusrivastavaofficial)

राजूने काय शिकवलं. मरण आहे, ते आज ना उद्या यायचेच पण पाठीमागच्यांना आपल्या आठवणींने नेहमी रडूच का यावे, हसूही आलं पाहिजे. राजू तुला आठवताना, तुझे व्हिडिओ पाहताना सर्वजण हसतील. पण आज तुझ्या असंख्य चाहत्यांच्या डोळ्यात फक्त अश्रूच आहेत. ते पुसायला तरी ये रे…! ( Comedian Raju Shrivastava Dies At 58 )

भावपूर्ण श्रद्धांजली किंग ऑफ कॉमेडी !

अधिक वाचा –
तब्बल 70 वर्षे ब्रिटनच्या महाराणी राहिलेल्या एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन; जगभरातून श्रद्धांजली
महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर राज ठाकरेंची पोस्ट व्हायरल; ‘कुठलाही राजमुकुट हा काटेरी असतो’


Previous Post

होय…तो परत फिरलाय! मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु, महाराष्ट्राबाबत स्थिती काय? जाणून घ्या

Next Post

सोसायटी निवडणूक : वाऊंड सोसायटीवर ‘या’ दोन तज्ज्ञ संचालकांची निवड

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Wound-Society-Maval-Taluka

सोसायटी निवडणूक : वाऊंड सोसायटीवर 'या' दोन तज्ज्ञ संचालकांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
girl-dies-after-drowning

इंदुरी येथे इंद्रायणी नदीपात्रात उडी मारून तरूणीची आत्म’हत्या

February 27, 2026
Strict measures to prevent accidents on highways Strict action against drunk drivers said Transport Minister

महामार्गांवरील अपघात रोखण्यासाठी कठोर उपाययोजना ; दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई – परिवहन मंत्री

February 27, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

“वारंवार नियमभंग करणाऱ्या ऑर्केस्ट्रा–बारवर कडक कारवाई करण्याबाबत कायद्यात दुरुस्ती करणार”

February 27, 2026
Dilip Dhore unanimously elected as group leader of Panchayat Samiti Maval in NCP meeting

Maval NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पंचायत समिती मावळच्या गटनेतेपदी दिलीप ढोरे यांची एकमताने निवड

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.