शारदीय नवरात्री उत्सवानिमित्त वडगाव शहरातील ( Vadgaon Maval ) महिलांसाठी मनसे नगरसेविका सायली रुपेश म्हाळसकर यांच्या वतीने मी दुर्गा बेस्ट सेल्फी कॉन्टेस्ट 2022 ही अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत नऊ दिवसातील नऊ रंगानुसार साडी परिधान करून दररोज एक स्वतःचा आकर्षक सेल्फी फोटो पाठवत एकूण 472 महिला स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. ( Competition on occasion of Navratri festival at Vadgaon Maval Pooja Shinde winner )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
रविवारी (9 ऑक्टोबर) कोजागिरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या दिमाखात आणि उत्साहात श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात बहुसंख्य महिलांच्या उपस्थितीत पार पडला. स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांपैकी नऊ दिवसातील नऊ रंगांप्रमाणे – 9 दुर्गा विजेत्या स्पर्धक निवडण्यात आल्या आणि नऊ दुर्गांपैकी लकी ड्रॉ पद्धतीने महादुर्गा भाग्यशाली विजेता निवडण्यात आली.
यावेळी प्रत्येक दुर्गा विजेता महिलेस पारितोषिक म्हणून 1 – मिक्सर, दुर्गे मातेचे प्रतीक असलेली 1 – सोन्याची नथ, सन्मान चिन्ह, गुलाब पुष्प देण्यात आले. तर महादुर्गा भाग्यशाली विजेता ठरलेल्या पूजा अनिल शिंदे यांना एक वॉशिंग मशीन भेट देऊन महादुर्गा 2022 म्हणून गौरवण्यात आले. तसेच काही स्पर्धक महिलांना उत्तेजनार्थ भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
हेही वाचा – आमदार शेळके आणि नगराध्यक्ष ढोरे यांच्या माध्यमातून वडगावमधील केशवनगर भागातील रस्ता आणि ड्रेनेजचे काम मार्गी
विजेत्या स्पर्धकांची नावे खालील प्रमाणे;
नऊ दिवसातील नऊ दुर्गा विजेत्या
1) रंग- पांढरा- नेहा जय भिलारे
2) रंग- लाल- कोमल निलेश जाधव
3) रंग- निळा- अंकिता कृष्णकांत सुतार
4) रंग- पिवळा- प्रतिभा प्रदीप थोरात
5) रंग- हिरवा- पूजा अनिल शिंदे
6) रंग- ग्रे करडा- विश्वांजली वैभव गायकवाड
7) रंग- केशरी- मनीषा मंगेश दरेकर
8) रंग- मोरपंखी- कोमल अक्षय वैद्य
9) रंग- गुलाबी- अर्चना संतोष कोंडे
बेस्ट रिल्स विजेत्या :
कु. मानसी शेळके – प्रथम क्रमांक
सौ. चित्रा निलेश देशमुख – द्वितीय क्रमांक
सौ. सुनिता कैलास तरळकर – तृतीय क्रमांक
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका अर्चना म्हाळसकर, माया चव्हाण, शारदा ढोरे, पूनम जाधव, सुनिता भिलारे, ज्योती जाधव, राष्ट्रीय समाज सहाय्यक समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षा अर्चना म्हाळस्कर-थिटे, पोटोबा देवस्थानच्या विश्वस्त सुनीता कुडे, अश्विनी म्हाळस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
अधिक वाचा –
महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर मावळात भाजपचा पहिला सरपंच ! Maval Politics
मावळकरांची उपचारासाठीची धावाधाव कमी होणार; कान्हे येथील उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम युद्ध पातळीवर सुरु