जुण्या पुणे-मुंबई महामार्गावर कान्हे फाटा इथे एका कंटेनरला आग लागल्याची घटना सोमवार (दिनांक 4 नोव्हेंबर) रात्री घडली. प्राप्त माहितीनुसार, जुना पुणे मुंबई महामार्गावरून जात असलेल्या एका कंटेनरला कान्हे फाटा इथे अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच वन्यजीव रक्षक मावळ संस्था, आपला मित्र मावळ टीम तसेच अग्निशमन विभागाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. ( container caught fire Kanhe Phata on old Mumbai Pune highway )
हा कंटेनर मुंबईहून पुण्याला जात होता. तनिष्का हॉटेलच्या समोर कंटेनरच्या इंजिनमध्ये आग लागली. यामध्ये कंटेनरची केबिन जळून पूर्णपणे खाक झाली. दुर्घटनेत एका दुचाकीचेही नुकसान झाले असून एक व्यक्ती जखमी झाला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे-लोणावळा दरम्यान दुपारच्या वेळेत लोकल सुरु करा; खासदार बारणेंची संसदेत मागणी, वाचा काय म्हणालेत बारणे
– आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून नाणोली तर्फे चाकण ते जांबवडे-सुदवडी-सुदुंबरे या रस्त्यासाठी सात कोटींचा निधी
– क्रिकेटपटू रवी शास्त्री यांच्या हस्ते वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन । Khopoli News