Dainik Maval News : तळेगाव-चाकण मार्गावर कंटेनरने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी (दि.2) सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. पूजा काटकर (वय 45, रा. नानोली, ता. मावळ) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर पूजा यांचे पती शांताराम काटकर (वय 45) हे जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांताराम काटकर आणि त्यांच्या पत्नी पूजा हे दुचाकी (एमएच 14/डीक्यू 5890) वरून तळेगाव येथून चाकणच्या दिशेने जात होते. योजना नगर येथे आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला कंटेनर (एमएच 46/बीएफ 7627)ने पाठीमागून धडक दिली.
अपघातात दोघेही रस्त्यावर पडले. पूजा या गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. तळेगाव दाभाडे वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. कंटेनर चालका विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– कोणतेही खाते दिले तरीही मी जनतेला न्याय मिळवून देईन – आमदार सुनिल शेळके । MLA Sunil Shelke
– अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात तरुणाला 20 वर्षांची सक्तमजुरी ; वडगाव मावळ कोर्टाचा निर्णय । Maval Crime
– पराजय स्वीकारायचा असतो आणि विजय झाला तर हुरळून जायचे नसते – बापूसाहेब भेगडे । Bapu Bhegade