व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात तरुणाला 20 वर्षांची सक्तमजुरी ; वडगाव मावळ कोर्टाचा निर्णय । Maval Crime

बिसोवजित मोनीलाल देबनाथ (वय 21) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 3, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Jail-And-Court

File Image


Dainik Maval News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला वडगाव मावळ न्यायालयाचे विशेष न्यायाधीश डी. के. अनभुले यांनी २० वर्ष सक्तमजुरी आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. बिसोवजित मोनीलाल देबनाथ (वय 21) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

13 वर्षीय मुलीशी देबनाथची ओळख झाली होती. त्याने मुलीला आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले. मुलगी गर्भवती राहिली. त्यानंतर तिच्या आईने तिला डाॅक्टरांकडे नेले. वैद्यकीय तपासणीत ती गर्भवती असल्याचे उघडकीस आले. आईने मुलीला विश्वासात घेऊन चौकशी केली. तेव्हा देबनाथने वेळोवेळी अत्याचार केल्याची माहिती तिने आईला दिली.

त्यानंतर मुलीच्या आईने पोलिसांकडे जुलै 2019 मध्ये तक्रार दिली. या खटल्यात विशेष सरकारी वकील स्मिता मुकुंद चौगले यांनी बाजू मांडली. सरकार पक्षाकडून पीडित मुलीची आई, मुलगी हिच्यासह आठ साक्षीदारांची साक्ष नोंदविली. आरोपीने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती केले. आरोपीला सहानुभूती दाखविली जाऊ नये. आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद ॲड. चौगले यांनी केला.

अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणात सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने दिलेले न्यायनिवाडे सादर केले. साक्ष आणि पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने देबनाथला शिक्षा सुनावली. तळेगाव पोलीस ठाण्यातील तत्कालrन सहायक पोलीस निरीक्षक डी. जे नागरगोजे यांनी या गुन्ह्याचा तपास केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी अविनाश गोरे यांनी न्याायलयीन कामकाजात सहाय्य केले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळके यांना भेटण्यासाठी मावळच्या कानाकोपऱ्यातून नागरिकांची गर्दी, महिला वर्गाची लक्षणीय उपस्थिती
– नवनिर्वाचित आमदार शंकरभाऊ मांडेकर यांनी घेतली आमदार सुनिल शेळके यांची भेट । Talegaon Dabhade
– स्तुत्य उपक्रम ! वडगाव मावळ शहरातील सर्व अंगणवाडी केंद्रातील ४५५ विद्यार्थ्यांना उबदार स्वेटर भेट । Vadgaon Maval


dainik maval jahirat

Previous Post

कोणतेही खाते दिले तरीही मी जनतेला न्याय मिळवून देईन – आमदार सुनिल शेळके । MLA Sunil Shelke

Next Post

गहुंजे गावातील आंचल मोरे हिची राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड ; मावळ तालुक्यातील पहिली फुटबॉलपटू । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Anchal More of Gahunje village maval selected for national football tournament

गहुंजे गावातील आंचल मोरे हिची राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड ; मावळ तालुक्यातील पहिली फुटबॉलपटू । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.