पवना नदीवरील नवीन पूल वाहतुकीसाठी खुला करावा – पवना नदीवरील कडधे-आर्डव येथील नवीन पुलाचे काम पूर्ण झाले असून या पुलावरून त्वरित वाहतूक चालू करावी, अशी मागणी मावळ तालुका जमीन हक्क परिषदेने केली आहे. परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माऊली सोनवणे व संपर्क प्रमुख पांडुरंग तुपे यांनी खडकवासला पाटबंधारे विभागाच्या शाखा अभियंत्यांची भेट घेऊन उपरोक्त मागणी केली. कडधे-आर्डव पवना नदीवरील नवीन बंधारा पुलाचे काम पूर्ण झाले असल्याने या पुलावरून वाहतूक चालू करण्यात यावी. परिसरातील आठ ते दहा गावांची प्रमुख बाजारपेठ असलेल्या पवनानगर व कामशेतला जोडणारा हा रस्ता बंद असल्यामुळे विद्यार्थी, वयोवृद्ध नागरिक, रुग्ण आदींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन रस्ता दोन दिवसात चालू करावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. ( The new bridge over Pavana river should be opened for traffic )
आदिवासी बांधवांचे जीवमान उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत – पुणे जिल्ह्यातील मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर, तसेच ठाण्यातील वाडा, मुरबाड आदी ठिकाणी मोठ्या संख्येने आदिवासी समाज राहतो. मात्र, तो एका ठिकाणी राहत नसल्याने विखुरलेले आहे. त्यामुळे शासनाच्या कोणत्याच विकासाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. परिणामी हा समाज विकासाच्या प्रवाहापासून दूर राहतो. त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावे, अशी मागणी बुद्ध अवशेष बचाव अभियानाचे संघटक भंते तिस्सावरो यांनी केली आहे. ( Efforts should be made to raise the standard of living of tribals )
अज्ञात वाहनाच्या धडकेत ओझर्डेतील ग्रामस्थाचा मृत्यू – भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दिनांक 24 ऑगस्ट) सकाळी सव्वासातच्या सुमारास पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ओझर्डे गावच्या हद्दीत घडली. चंद्रकांत बबन पारखी (वय 48, रा. ओझर्डे, ता. मावळ) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी रोहिदास लहू पारखी (वय 45) यांनी शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( A villager of Ozarde village died in a collision with an unknown vehicle )
कन्व्हेयन्स डीडबाबत वडगावमध्ये मार्गदर्शन – मावळ तालुक्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांचे मानीव अभिहस्तांरण (कन्व्हेयन्स डीड) बाबत मार्गदर्शन करण्यासाठी 28 ऑगस्ट व 3 सप्टेंबर रोजी वडगाव येथे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती मावळ तालुका सहकारी संस्था विभागाचे सहायक निबंधक सर्जेराव कांदळकर यांनी दिली. वडगाव येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात 28 ऑगस्ट आणि 3 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता हे चर्चासत्र होणार आहे. यात तज्ज्ञ व्यक्तींमार्फत सहकारी संस्थांना अभिहस्तांतरण (कन्व्हेयन्स डीड) बाबत येणाऱ्या अडचणी तत्काळ सोडवून त्यांचा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी तयार करून देण्यात येणार आहे. तालुक्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी उपलब्ध कागदपत्रांसह या चर्चासत्रात उपस्थित राहावे, असे आवाहन कांदळकर यांनी केले आहे. ( Guidance session in Vadgaon city regarding conveyance deed )
यूथ क्लायंबर चॅम्पियनशिपमध्ये आदित्यला कांस्यपदक – बंगळूर येथे झालेल्या राष्ट्रीय यूथ क्लायंबर चॅम्पियनशिपमध्ये शिवदुर्ग क्लायंबिंग टीमच्या आदित्य पिलाने याने कांस्यपदक पटकाविले. शिवदुर्गच्या तीन क्लायंबरनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये आदित्य याने 18 ते 19 या वयोगटामध्ये कांस्यपदक मिळवीत अभिमानास्पद कामगिरी केली आहे. नोव्हेंबर मध्ये चोंगकिंग, चीन येथे होणाऱ्या एशियन यूथ चॅम्पियनशिपसाठी जागा निश्चित केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय क्लायंबिंग टीमबरोबर परफॉर्म करणारा आदित्य शिवदुर्गचा पहिलाच क्लायंबर आहे. ( Bronze Medal to Aditya Pilane in Youth Climber Championship )
( dainik maval bulletin read all important news of maval taluka in one click )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मोठी कारवाई! भंडारा डोंगर परिसरात दरोडा टाकणारी टोळी जेरबंद; देशी पिस्तूलांसह इतर हत्यारे आणि मुद्देमाल जप्त
– दुकानदारांनो, सावधान! अनधिकृत वजन काटे विक्री केल्यास किंवा वापरल्यास होणार कडक कारवाई
– गौरी-गणपतीसाठी सरकारकडून 100 रुपयात मिळणार ‘आनंदाचा शिधा’, पाहा कधी आणि कुणाकुणाला मिळणार शिधा?