मावळ तालुका भारतीय जनता पार्टी पक्षाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते दत्तात्रय गुंड यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. पक्षाचे विद्यमान तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे हे पदावरुन पायउतार झाले आहेत. वडगाव मावळ येथील पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ही निवड जाहीर करण्यात आली. दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड यांच्या रुपाने भाजपच्या तालुकाध्यक्षपदी पुन्हा एकदा ग्रामीण भागातील चेहऱ्याला संधी दिली गेली आहे.
दत्तात्रय गुंड हे भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून तालुक्यात परिचित आहेत. तसेच ते जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहिले आहेत. यासह पक्षाच्या विविध पदांची जबाबदारी त्यांनी यापूर्वी चांगल्या प्रकारे पार पाडली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– माजी उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर यांच्याकडून गणेश भक्तांना 35000 हजार मोदकांचा महाप्रसाद वाटप
– फक्त लोणावळाच नाही तर मावळमधील कुसूर पठार देखील बनणार ‘जागतिक पर्यटन केंद्र’, वाचा काय म्हटलेत अजितदादा…
– अजितदादांचे मावळच्या जनतेला गणेशोत्सवाचे सर्वात मोठे गिफ्ट! आमदार सुनिल शेळकेंच्या पाठपुराव्याला यश