कामशेत पवनानगर रस्त्यावर ‘तरस’ प्राण्याचा अपघात झाला असून त्यात ते मृत पावले आहे. मागील अनेक दिवसांपासून पवनानगर, कडधे, येळसे, करुंज, बौर परिसरात ‘तरस’ नागरिकांच्या निदर्शनास येत होते. परंतू आज (दि. 2) सकाळी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील ओव्हर ब्रीजजवळ तरस गंभीर जखमी आणि मृत अवस्थेत आढळून आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
कामशेत आणि पवनानगर रस्त्यावर बऊर पाटीजवळ मुंबई-पुणे एक्सप्रेस वे मार्गाचा ओव्हर ब्रीज आहे. या ब्रीजच्या जवळ हे तरस जखमी आणि मृतावस्थेत आढळले. तरसाच्या अंगावर असलेल्या जखमा पाहता ते अपघातग्रस्त झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सदर घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तरस ताब्यात घेतला. Dead Hyenas Found on Kamshet Pavananagar Road Maval
सदर मृत तरस पूर्णपणे वाढ झालेला होता. भक्ष्याच्या शोधात तो रस्त्याजवळ आला असावा आणि वाहनांच्या प्रकाशझोतामुळे डोळे दिपल्याने भेदरून तो रस्त्यावर आल्याने अज्ञात वाहनाच्या धक्क्याने मृत पावला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
अधिक वाचा –
– ‘विकेल ते पिकेल’ अभियानाअंतर्गत तळेगाव दाभाडे शहरात ‘शेतकरी आठवडी बाजार’ सुरु, आमदार शेळकेंच्या हस्ते उद्घाटन । Talegaon Dabhade
– दीडशे शेळ्या-मेंढ्या दगावलेल्या ‘त्या’ गरीब मेंढपाळाला मावळ तालुक्यातील दानशूर व्यक्तींकडून मदतीचा हात! Maval News
– ‘सरकार झोपलंय..त्यांना जागं करण्यासाठी घंटानाद’, राष्ट्रवादीचा तहसील कार्यालयावर मोर्चा, नागरी समस्यांची लांबलचक यादी प्रशासनाला सुपूर्द