कोर्टात केस दाखल केल्याचा राग मनात धरुन हॉटेल व्यावसायिकाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार मावळ तालुक्यातील गहुंजे गावात घडला आहे. याप्रकरणी फिर्यादी अविनाश हरीभाऊ बोडके (वय 42, व्या. हॉटेल व्यावसाय रा. गहुंजे ता. मावळ जि. पुणे) यांनी शिरगाव पोलिसांत फिर्याद दाखल केली. ( Death Threat To Hotel Owner In Gahunje Village Of Maval Taluka Case Registered In Shirgaon Police Station )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
त्यानुसार पोलिसांनी आरोपी प्रमोद ज्ञानेश्वर बोडके (रा. गहुंजे ता मावळ जि पुणे) याच्याविरोधात शिरगाव पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 504, 506 आणि भा.ह.का. कलम 4 (25) म.पो.का. कलम 135 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दिनांक 1 मार्च रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास गहुंजे गाव इथे ही घटना घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अविनाश बोडके यांनी आरोपी प्रमोद बोडके याच्या विरोधात कोर्टात केस दाखल केली असल्याचा राग मनात धरुन आरोपी याने हातात लाकडी फाळके घेऊन शिवीगाळ करुन फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्या घरा समोरुन फिर्यादीचे घराचे दिशेने कोयता घेऊन आला आणि फिर्यादीचे नाव घेऊन पुन्हा शिवीगाळ केली, असे फिर्यादीत नमूद आहे. त्यानुसार फिर्यादीवरुन आरोपीवर दिनांक 02 मार्च रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नसून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उप निरिक्षक मुळीक हे करत आहेत.
अधिक वाचा –
– अपघात ब्रेकिंग! सोमाटणे-परंदवडी रोडवर बगॅस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात
– आर्मी हेडक्वार्टरजवळ चोरी, स्टोअर रुममधून हजारोंचा मुद्देमाल लंपास, देहूरोड पोलिसांत गुन्हा दाखल