आंबळे ग्रामपंचायत हद्दीत असलेली दगड खाण आणि अवैध स्टोन क्रशर कायम स्वरुपी बंद करण्याच्या विरोधात शुक्रवारी (दि. 9) पद्मावती देवी मंदिरात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी उपसभापती शांताराम कदम, सरपंच आशा कदम, उपसरपंच रेखा भालेराव, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मावळ तालुक्यातील आंबळे ग्रामपंचायत हद्दीतील शिरे शेटेवाडी येथे दगड खाण आणि त्यावर खडी तयार करणाऱ्या स्टोन क्रशरमुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला असून क्रशरच्या धुळीमुळे सामन्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
नागरिकांच्या आरोग्यावर या धुळ आणि वातावरणाचा गंभीर परिणाम होत असून अनेकांना श्वसनाचे आजार, दमा अशा आजारांची लागन होऊ लागली आहे. तसेच सततच्या वाहतूकीमुळे रस्त्यांची दुर्दशा होत असून धुळीमुळे वातावरण कोंदटल्यासारखे बनले आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळेच ही खाण आणि अवैध स्टोन क्रशर कायमस्वरूपी बंद करावा, असा ठराव ग्रामसभेत करण्यात आला आहे. तसेच याबाबत कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा निर्णयही ग्राम सभेत घेण्यात आला. या ग्रामसभेत प्रत्येक गावातील सह्या झालेली 627 हरकत घेणारी पत्रे जमा झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. (Demand for permanent closure of stone quarry and stone crusher located at Shire Shetewadi Amble Gram Panchayat)
दगड खाणीचा आणि स्टोन क्रशरचा इतिहास –
आंबळे ग्रामपंचायत हद्दीत मागील 15 वर्षांपासून ह्या खाणी आणि त्यावर खडी तयार करणाऱ्या स्टोन क्रशर कंपन्या आहेत. यातून निर्माण होणाऱ्या धुळीमुळे परिसरातील प्रदूषणात मोठी वाढ झाली असून धुळीमुळे हवेचा दर्जा खालावला आहे. तसेच सततच्या अनियंत्रित उत्खननामुळे सदर भागातील जैवविविधता धोक्यात आली आहे.
20 ते 25 स्टोन क्रशर बेकायदेशीररित्या येथे दिवस रात्र सुरु असल्याचे दिसते. त्यामुळे दिवसरात्र डबर वाहतूक सुरु राहते, यातूनच आतापर्यंत 8 ते 10 लोकांना आपला जीव गमाववा लागला असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. गावावर जमा होणार धुळीचा स्तर, ध्वनी प्रदुषण, विद्यार्थ्यांना होणारा त्रास, वाहतूकीतून होणारे अपघात, पिकांवर धुळीचा होणार परिणाम, यामुळे त्रस्त गावकऱ्यांनी यापूर्वी देखील अनेकदा आंदोलने केली परंतू शासकीय यंत्रणा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय. त्यामुळेच आता ग्रामस्थांची सुरक्षितता आणि भवितव्यासाठी स्टोन क्रशर, दगड खान, वाळू वाहतूक आणि ब्लास्टिंग कायमस्वरूपी बंद करावेत, असा एकमुखी निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला आहे.
अधिक वाचा –
– श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड बिनविरोध, पाहा नवनिर्वाचित कार्यकारिणी । Talegaon Dabhade
– बीव्हीजी ॲग्रोटेकचे ‘गो से गोमाता’ अभियान; आमदार शेळकेंच्या उपस्थितीत मावळमधील 300 शेतकऱ्यांना ‘रज्जो’ औषधाचे वाटप
– मोठी बातमी! पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक, पाहा रद्द झालेल्या लोकल गाड्यांची यादी । Mega Block on Pune Lonavala Railway Route