Dainik Maval News : आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची 235 वी जयंती येत्या 7 सप्टेंबर रोजी साजरी होत आहे. ही जयंती तालुक्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयांत आणि ग्रामपंचायतींमध्ये साजरी व्हावी, अशी मागणी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक क्षत्रिय रामोशी संघटना मावळ तालुका यांच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत मागणीचे पत्र तहसीलदार विक्रम देशमुख यांच्याकडे, तसेच पंचायत समिती समिती सभापती सुनीता मनोज येवले, गटविकासअधिकारी (प्रभारी) सेवक थोरात यांच्याकडे (दि. 12 ऑगस्ट) देण्यात आले. दरम्यान प्रशासनाला पत्र दिल्यानंतर संघटनेचे पदाधिकारी यांनी ‘दैनिक मावळ’सोबत संवाद साधला, व मावळ तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्याबाबत आवाहन केले.
दरम्यान संघटनेच्या पत्राची तत्काळ दखल घेत, पंचायत समितीचे उपसभापती साहेबराव कारके आणि पंचायत समिती सदस्य समीर जाधव यांनी पंचायत समितीत हा मुद्दा उपस्थित केला. राजे उमाजी नाईक यांची जयंती येत्या 7 सप्टेंबर 2026 रोजी शासकीय कार्यालये व ग्रामपंचायत मध्ये साजरी व्हावी, याबद्दल भाष्य केले.
आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक क्षत्रिय रामोशी संघटना मावळ तालुका चे सचिव शाम लांडगे, सहकार्यअध्यक्ष सचिन चव्हाण, तसेच भटके विमुक्त जमाती सेल राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुका उपाध्यक्ष खंडू चव्हाण आणि समाजातील इतर पदाधिकारी, नेते याप्रसंगी उपस्थित होते.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत गांजा बाळगणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
– टाकवे बुद्रुक जवळील इंद्रायणी नदी पुलावर खड्डे ; खड्ड्यातून लोखंडी सळई बाहेर; दुचाकीसह चारचाकी वाहनांना अपघाताचा धोका
– शिरवळ येथे पुणे-सातारा महामार्गावर झालेल्या अपघातात मावळातील चार युवकांचा मृत्यू
– महत्वाची बातमी ! पाथरगाव येथील इंद्रायणी नदीवरील जुना दगडी पूल सुरक्षिततेच्यादृष्टीने वाहतुकीसाठी बंद


