Dainik Maval News : वडगाव मावळ लीगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने शुक्रवारी (दि.3) मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना मावळ तालुक्यात कायमस्वरुपी उपविभागीय अधिकारी मावळ कार्यालय सुरु करावे अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी वडगाव मावळ लीगल प्रॅक्टिशनर्स संघटनेचे अध्यक्ष ॲड सोमनाथ पवळे, सचिव ॲड अक्षय रौंधळ, ॲड धनंजय कोद्रे, ॲड. अक्षय लोखंडे आदीजण उपस्थित होते.
या निवेदनामध्ये म्हटले आहे की, मावळ तालुक्यामधून दोन महामार्ग जात आहेत. तसेच एमआयडीसी, रिंग रोड, आंद्रा धरण, पवना धरण व इतर धरणे, तसेच महसुली प्रकरणे, आरटीएस अपिले आदी उपविभागीय अधिकारी यांचे अखत्यारीत येतात. मावळ तालुक्यातील नागरिकांना जवळजवळ 67 किलोमीटरचा प्रवास करून बावधन, औंध पुणे येथे जावे लागते. त्यासाठी खुप मोठा खर्च व वेळ वाया जातो.
सदर ठिकाणी जाण्यास पुरेशी वाहन व्यवस्था नाही. पक्षकार, नागरिक, वकील यांचा एका कामासाठी पूर्ण दिवस जातो. आदी मागण्या विचारात घेऊन मावळ तालुक्यातच उपविभागीय कार्यालय सुरू करण्याची विनंती निवेदनाद्वारे संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती आमदार सुनील शेळके, महसूलमंत्री, जिल्हाधिकारी पुणे यांना देखील पाठविण्यात आल्या आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुका पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाशी जोडला जाणार ; वडगाव, कामशेत, लोणावळा ठाण्यांबाबत प्रस्ताव सादर
– मराठी शाळा स्मार्ट व डिजिटल बनविणे काळाची गरज ; परांजपे विद्या मंदिर शाळेला डिजिटल इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड भेट
– तळेगाव दाभाडे शहरातील 350 वर्षे पुरातन बामणडोह विहिरीचे होणार संवर्धन, प्रत्यक्ष कामाला सुरुवात । Talegaon News