किवळे येथील नामांकीत कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थाला अं’मली पदार्थाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भिती दाखवून त्याच्याकडून वेळोवेळी नेट बँकींग तसेच बँक खात्यात पैशाची मागणी करत तब्बल 4 लाख 98 हजार उकळल्याची धक्कादायक घटना देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या संपूर्ण कटात दोन पोलिसांचा देखील सहभाग असल्याचे प्रथम दर्शनी समोर येत आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ अर्थात ‘सज्जनांचे रक्षण व दुष्टांचा नाष’ असे ब्रीदवाक्य असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनीच पोलीस दलाची मान शर्मेने खाली आणण्याची वेळ देहूरोड येथे आणली आहे. किवळे येथील विद्यालयात शिकणाऱ्या वैभवसिंग चौहान या विद्यार्थ्यांकडून 8 आरोपींनी संगणमत करून 4 लाख 98 हजार लाटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांसोबतच देहरोड कॅन्टोमेंट बोर्डचा माजी उपाध्यक्ष अमीन शेख याचा मुलगा अमन अमीन शेख हा देखील या गुन्ह्यात आरोपी आहे. (demands ransom from rich boy threatening to implicate him in ganja case crime registered against 8 people dehuroad)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल चौधरी, अमन अमीन शेख, हुसेन डांगे, मोहम्मद अहमेर मिर्ज़ा, शंकर गोर्डे, मुनामस्वामी, पोलीस कर्मचारी हेमंत गायकवाड, पोलीस कर्मचारी सचिन शेजाळ (नेमणूक देहुरोड पोलीस ठाणे) अशी आरोपींची नावे आहेत. यातील आरोपी क्रमांक 1 ते 4 पोलिसांच्या ताब्यात असून 4 जण आद्याप फरार आहेत. संबंधित गुन्ह्यात फिर्यादी विद्यार्थ्याकडून 20 लाख रुपयाची आरोपींनी मागणी केली होती. गंहुजे स्टेडीयम जवळ नेऊन तसेच पोलीस ठाण्यात बळजबरीने बोलावून धमकावत वेळोवेळी नेट बॅकिंग, गुगल पे, तसेच बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये विद्यार्थ्याकडून 4 लाख 98 हजार उकळल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
आरोपींच्या त्रासाला कंटाळून फिर्यादी वैभव सिंग याने आपल्या पालकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार पालकांनी या घटनेची माहिती थेट वरीष्ठ अधिकाऱ्यांना देत देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्यातील अरोपी अमन अमिन शेख याच्यावर काही महिण्यापूर्वी अशाच प्रकारचा खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात पोलिसांना हताशी धरून वरील सहा आरोपींनी हा गुन्हा केला असल्याचे पोलीस ठाण्यात दाखल तक्ररी वरून दिसून येत आहे. गुन्ह्यात फरार असलेले पोलीस कर्मचारी हेंमत गायकवाड, सचीन शेजाळ यांच्या सह इतर दोघांचा शोध देहुरोड पोलीस घेत आहे.
अधिक वाचा –
– ग्रामपंचायत महागाव, भोयरे आणि पिंपरी येथे शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालनाबद्दल मार्गदर्शन । Maval News
– काळीज तोडणारी घटना… धनगव्हाण गावात गोठ्याला आग लागल्याने दोन जनावरांचा होरपळून मृत्यू, साठवलेला चाराही जळाला
– ।। राम कृष्ण हरी ।। श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर अखंड हरीनाम सप्ताह, गाथा पारायण आणि कीर्तन महोत्सवानिमित्त अखंड अन्नदान सेवा