मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सरपंच परिषदेच्या अध्यक्षपदी धामणे ग्रामपंचायतीचे सरपंच अविनाश मनोहर गराडे यांची निवड करण्यात आली. मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांनी त्यांची नियुक्ती केली. मावळचे आमदार सुनील शेळके, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात सरपंच परिषदेचे काम करणार असल्याचा विश्वास सरपंच गराडे यांनी व्यक्त केला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
लोणावळा येथे झालेल्या पक्षाच्या कार्यक्रमात गराडे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस मंजुश्री वाघ, लोणावळा शहर अध्यक्ष विलास बडेकर, ज्येष्ठ नेते नारायण पाळेकर, तालुका सरचिटणीस जीवन गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी सुनील भोंगाडे, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष किशोर सातकर, बाजार समिती बाजार समिती संचालक शिवाजी असवले, राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस विक्रम कदम, सरचिटणीस संतोष नरवडे, युवकचे कार्याध्यक्ष सचिन मु-हे, माजी सरपंच मनोज येवले, राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष नंदकुमार गराडे, पवन मावळचे माजी अध्यक्ष उत्तम घोटकुले, सरपंच राकेश घारे,पवन मावळचे माजी अध्यक्ष चंद्रकांत चांदेकर, ओव्हळेचे सरपंच सोमनाथ इंगळे, शिवणेचे सरपंच महेंद्र वाळुंज, माजी उपसरपंच संदिप भालेराव, प्रसाद काळोखे, मयूर येवले उपस्थित होते.
प्रत्येक सरपंचानी गावच्या भौतिक विकासाच्या पलीकडे जाऊन केंद्र व राज्य शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविल्या पाहिजे. शाश्वत विकास याच ध्येयावर बहुउद्देशीय संकल्पनेवर झोकून देऊन काम केले पाहिजे. तालुक्यातील सर्वच गावांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कार्यतत्पर राहणे आवश्यकता आहे असेही गराडे यांनी म्हटले. ( Dhamane Village Sarpanch Avinash Garade appointed as President of Maval Taluka NCP Sarpanch Parishad )
“राष्ट्रवादी काँग्रेस सरपंच परिषदेच्या माध्यमातून सातत्याने चर्चा, निवेदने, अंदोलने अशा सनदशीर मार्गाने शासनाकडे सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्या मागण्यांबाबत आग्रही असणार आहे. ग्रामपंचायतीच्या मागण्या, समस्या, अडचणी या मूलभूत प्रश्नांवर शासकीय पातळीवर मांडण्यासाठी सरपंच परिषद हक्काचे व्यासपीठ आहे.” – अविनाश गराडे
अधिक वाचा –
– मोठी बातमी! पीडीसीसी बँकेद्वारे मावळ तालुक्यातील शेतकरी बांधवांना 100 कोटी रूपये कर्ज वाटप केले जाणार
– कामशेतमध्ये श्री संत रोहिदास महाराज भवन बांधण्यासाठी 50 लाखांचा निधी देणार, आमदार सुनिल शेळकेंची घोषणा । Kamshet News
– राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते लोणावळा येथे शिक्षक संमेलनाचे उद्घाटन; विद्यार्थ्यांना गृहपाठ देण्याऐवजी सर्वांगिण प्रगतीची संधी द्या – राज्यपाल