वडगाव मावळ, दि. 26 जून – संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल, दिव्यांग, विधवा तसेच निराधार असलेल्या 278 लाभार्थींना कुलस्वामिनी महिला मंचच्या अध्यक्षा सारिका शेळके यांच्या हस्ते मंजुरी पत्रकांचे वाटप विश्रामगृह वडगाव मावळ येथे करण्यात आले. “आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनातून सर्वसामान्य गरजू व्यक्तींना अशा शासकीय योजनांचा लाभ मिळाला याचा आनंद आहे,” अशा भावना सारिका शेळके यांनी व्यक्त केल्या. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
दुर्बल घटकांना,दिव्यांग व वृद्ध व्यक्तींना आर्थिक आधार मिळावा या हेतूने सरकार अशा योजना राबविते, मात्र या योजनेच्या लाभासाठी योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे कागदपत्रांची पूर्तता करताना सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. नागरिकांची हीच अडचण लक्षात घेऊन आमदार सुनिल शेळके यांच्या जनसंपर्क कार्यालयामार्फत कागदपत्रे जमा करणे, त्याची पूर्तता करणे आणि विविध स्तरावर पाठपुरावा करणे असे सहकार्य केले जाते. त्यामुळे गरजु लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचविण्यास मदत होत असल्याचे मत लाभार्थ्यांनी व्यक्त केले. ( Distribution of Beneficiary Certificate to 278 Beneficiaries of Maval Taluka under Sanjay Gandhi Niradhar Yojana )
कार्यक्रमाला नायब तहसीलदार जयश्री मांडवे, संजय गांधी निराधार योजना समितीचे माजी अध्यक्ष नारायण ठाकर, माजी सदस्य अजिंक्य टिळे, राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेल अध्यक्ष सुभाष शेडगे, रुपेश सोनुने, नबिलाल आत्तार, गणेश तळपे व इतर मान्यवर उपस्थित होते.
अधिक वाचा –
– शिंदे सरकारचा मोठा निर्णय ! आता पीक कर्ज मिळवताना ‘ही’ अट नसणार ; अल्प, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना होणार फायदा
– श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या तैलचित्राचे अनावरण । Khashaba Jadhav
– देहूरोड ते खेडशिवापूर दरम्यान पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन । Pune News