कामशेत : आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून नाणे मावळातील खांडशी ग्रामपंचायत अंतर्गत उंबरवाडी येथील 26 कातकरी बांधवांना जातीच्या दाखल्यांचे मोफत वाटप करण्यात आले. ( Distribution of caste certificate to Katkari tribal people through MLA Sunil Shelke )
कातकरी बांधव प्रामुख्याने ग्रामीण भागातील दुर्गम वाड्या-वस्त्यांवर रहात असल्याने त्यांना शासकीय कार्यालयात जाऊन जातीचा दाखला काढण्याची प्रक्रिया पूर्ण करणे शक्य होत नाही. ही अडचण ओळखून आमदार सुनिल शेळके यांनी मागील तीन वर्षांपासून ‘आदिम कातकरी सेवा अभियान’ राबवून तालुक्यातील वाड्या-वस्त्यांवर जाऊन कातकरी बांधवांच्या कागदपत्रांचे संकलन करत अर्ज भरुन घेतले. त्यानंतर टप्प्याटप्याने प्रत्येक गावात जाऊन मोफत जातीचे दाखले वाटप करण्यात आले. याचा फायदा दोन हजारांहून अधिक कातकरी कुटुंबाना आजपर्यंत झाला आहे.
कातकरी बांधवांसाठी महत्वाचा असणारा जातीचा दाखला त्यांना मोफत घरपोच उपलब्ध झाल्याने कातकरी बांधवांनी आमदार सुनिल शेळके यांचे आभार व्यक्त केले. यावेळी स्वीय सहाय्यक सचिन वामन, ज्ञानेश्वर मोहिते, सदस्य शिमग्या वाघमारे, किसन कोळी, शिवाजी जाधव, भगवान जाधव, विजय वाघमारे, संतोष पवार, पांडुरंग कोळी आदी उपस्थित होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून आंदर मावळातील 39 आदिवासी बांधवांना मोफत जातीचे दाखले वाटप
– तालुक्यात सर्वाधिक बक्षिसे जिंकत पवनेच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिलं; ‘गावात राहत असलो तरी बुद्धीच्या स्पर्धेत शिखरावर आहे’
– लोणावळा पोलिसांची कर्तव्यदक्षता! पर्यटकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता आणि सुरक्षिततेसाठी केल्यात विशेष उपाययोजना
– टाकवेत भाजपाचा कार्यकर्ता संवाद मेळावा; शरद बुट्टे-पाटील यांच्या उपस्थितीत आंदर मावळातील अनेक दिग्गजांचा पक्षात प्रवेश